भारताने जगाला ज्या काही अनमोल भेटी दिल्या आहेत, त्यातील एक महत्वाची, आरोग्यदायी भेट म्हणजे आयुर्वेद होय. या आयुर्वेदाचे जनक असलेल्या धन्वंतरी यांची आज जयंती साजरी होत आहे. या निमित्ताने आपण दर मंगळवारी आपलं आयुर्वेद हे अत्यन्त उपयुक्त सदर सादर करीत आहोत.
गेली ३५ वर्षे आयुर्वेदिक उपचार करणाऱ्या, आयुर्वेद लोकप्रिय व्हावा म्हणून सतत प्रयत्न करणाऱ्या डॉ. स्वाती दगडे हे सदर लिहिणार आहेत.
आपल्या न्यूजस्टोरीटुडे परिवारात त्यांचं स्वागत करून, आजचा पहिला भाग पाहू या…
– संपादक
धन्वंतरी
दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी.
आज धनतेरस कार्तिक कृष्णत्रयोदशी. म्हणजे दिपावलीच्या पूर्वी, आज आपण धनाची पूजा करतो. सर्वजण पूजेच्या गडबडीत असाल ना ?😊 असो !
आजचा दिवस विष्णुचे अवतार, देवांचें देव धन्वंतरी यांचा पृथ्वीवर अवतरण होण्याचा दिवस, जन्मदिवस. समुद्र मंथनातून आज धन्वंतरींची उत्पत्ती झाली. ह्यांनीच आयुर्वेदशास्राची उत्पत्ती केली. धन्वंतरींना आरोग्यदेवता म्हणूनही ओळखतात, मानतात.
धन्वंतरीं हे चतुर्भूज आहेत. त्यांच्या वरील दोन हातात शंख, चक्र आहेत व खालील दोन हातात जलौका, औषधी व अमृतघट आहे. ह्यांचा आवडतां धातू पितळ आहे म्हणून ह्या दिवशी पितळादी धातूंची खरेदी करतात.
धन्वंतरींनी नवीन, विविध अमृतमय औषधींचा शोध लावला. ह्यांचे वंशज दिवोदास ह्यांनी काशीमध्ये विश्वातील पहिले शल्य विद्यालय चालू केले. त्याचे प्रधान आचार्य सुश्रृत होते. पौराणिक काळात धन्वंतरींना खूप महत्व होते व अर्थात आजही आहेच.
धन्वतरींची प्रार्थना
।ॐ
धन्वतरयेनम: ।
ह्या मंत्राने करतात.
प्रचलित धन्वंतरी स्तोत्र असे आहे –

– लेखन : डॉ स्वाती दगडे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800