Tuesday, September 16, 2025
Homeलेखआपलं आयुर्वेद - भाग - २

आपलं आयुर्वेद – भाग – २

श्री धन्वतरयेनम:।

नमस्कार मंडळी.
मी डॅा.स्वाती रानभरे दगडे .बी.ए.एम.एस.,
पो.ग्रॅ.फे.इन पंचकर्म.
मित्र मैत्रिणींनो आपण पहिल्या भागात आयर्वेदाचे जनक धन्वंतरी यांची माहिती घेतली. आजपासून ‘आयुर्वेद ‘ या आपल्या अतिप्राचिन व अनमोल अशा वैद्यकशास्राविषयी जाणून घेणार आहोत. तसे तुम्ही सर्व जाणकार आहात .परंतु आयुर्वेद या नावाखाली बऱ्याच लोकांची फसवणूक होते. बरेच समज -गैरसमज आहेत. ते दूर करण्याचा व समाजाला या आपल्याच शास्त्राची ओळख करून देण्याच्या हा अल्पसा प्रयत्न आहे. अर्थात ह्या पाठीमागची मूळ संकल्पना श्री देवेंद्र भुजबळ यांचीच आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके थोडेच.

मुळात भारतीय शास्त्र अतिप्राचिन (रचनाकाल ५००० वर्ष पूर्व) आहे. ह्याचे वर्णन प्रामुख्याने ४ वेदांमध्ये आढळते.
१) ऋग्वेद
२) यजुर्वेद
३) अथर्ववेद
४) सामवेद

आयुर्वेदाचे वर्णन चारही वेदांमध्ये थोड्याफार प्रमाणात आढळते.
१) ऋग्वेदात -आयुर्वेदाचे अतिमहत्वाचे सिध्दान्त सापडतात. उद्देश, वैद्याचे गुण-कर्म, ६७ प्रकारच्या औषधी, शरीर अंकाचे वर्णन तसेच चिकित्सा -अग्नी, जल, सुर्य, शल्य, विष आणि वशीकरण.
२) यजुर्वेदामध्ये -८२ औषधी, शरीर अंग, वैद्याचे गुण -कर्म, निरोगता, तेज, वर्चस इ.
३) सामवेदामध्ये मन्त्रविद्या, अत्यल्प रोग चिकित्सा.
४) अथर्ववेद -ह्यामध्ये आयुर्वेदाचे वर्णन जास्त प्रमाणात आढळते.

आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद-आत्मा -मूळ आधार आहे. आयुर्वेदाच्या अंग-उपअंगाचे वर्णन.
वैद्याचे गुण, कर्म, भिषज, भैषज्य, दीर्घायुष्य, वाजीकरण, रोगनाशक विविध मणी, प्राण –चिकित्सा, शल्य, जल, सूर्य चिकित्सा, वशीकरण चिकित्सा ह्यांचे वर्णन विविध औषधींची नावे, गुण, कर्म इ.चे वर्णन आढळते.

आयुर्वेदाच्या इतिहासानंतर आता आपण प्रत्यक्ष आयुर्वेदाबद्दल जाणून घेणार आहोत.
आयुष: वेद :इति आयुर्वेद:
आपल्या सर्वांसाठी महत्वाचे जे आयुष्य त्याचे वर्णन, माहिती जो सांगतो तो आयुर्वेद.
हिताहितम् सुखं दू:खं आयु: इति अभिद्यते।-आयुष्यासाठी हितकर -सुखकर काय ? अहितकर -दू:खकर काय ? ह्याचे वर्णन प्रामुख्याने आढळते. अर्थात आयुष्याचे सारच सापडते.

आयुर्वेदाचे आचार्य अश्वीनीकुमार हे ह्या शास्रात पारंगत होते. त्यांच्याकडून इंद्राने ही विद्या प्राप्त केली. त्यांनी ती श्री धन्वंतरींना शिकवली. श्री काशीक्षेत्राचे राजे दिवोदास ह्यांना धन्वतरींचे अवतार मानतात. महर्षी सुश्रृतांनी आयुर्वेदाचे शिक्षण घेतले. शल्य चिकित्सेतील संदर्भ आयुर्वेदात आढळतात व तसे पुरावेही सापडतात.
थोडक्यात -अश्वीनीकुमार

धन्वतरी

नकुल, सहदेव, अर्कि, च्यवन, जनक, बुध, जावाल, जाजली, पैल, अगस्ती (६ शिष्य) अग्नीवेश, भेड,
जातुकर्ण, पराशर,  सीरपाणि, हारित

सुश्रृत, चरक
अशी गुरू -शिष्य परंपरा सापडते.
क्रमशः

डॉ स्वाती दगडे

– लेखन : डॉ स्वाती दगडे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments