Friday, November 22, 2024
Homeलेखआपलं वेब पोर्टल !

आपलं वेब पोर्टल !

मनात प्रतिभा चमकली.
कविता अवचित सुचली.
पानावर अलगद उतरली.
नाचत आनंदात बागडली.
गोल गिरकी घेत धावली.
अलकाच्या कुशीत स्थिरावली
. ….

छान छान काही तरी सुचतंय, वेगवेगळ्या विषयावर लिहावसं वाटतयं, पण कुठे पाठवायचं समजतच नव्हतं. आपल्या प्रतिभेला चारचांद लागले, कुणी वाचले तर….अजून काही सुचत जाईल अजून काही लिहिलं जाईल.
 
हो, ना ! मग, किती छान आपण लिहिते होत जाऊ…. असेच मनात विचार येत असतानाच अलकाचा फोन आला आणि www.newsstorytoday.com हे वेब पोर्टल, तिची मुलगी देवश्री चालू करतेय, म्हणून तिने सांगितले. अगदी ‘ये दिल’ से निकली हुई बात…. अलकाच्या मनापर्यंत कशी पोहचली.
वा, मनातच गोल गिरकी घेतली.

मग मी माझ्या काही कविता पाठवत गेली आणि माझ्या कविता छान सजवून मस्त पोर्टल वर झळकू लागल्या. मला आनंद झाला. वाचक वाचू लागले. प्रतिसाद देऊ लागले.

अलका आणि देवेंद्र भुजबळ या दांपत्यानी मला लिहिते केले. मी या पोर्टल मध्ये आलेले वेगवेगळ्या विषयांचे लेख वाचू लागले आणि खूप विषयांची माहिती मला समजत गेली.

एखाद्या गाण्याबद्दल मस्त आठवणी, एखाद्या विषयावर लेख, दिग्गज व्यक्तीबद्दल आदर, संस्थेची माहिती, सणवार, आपली परंपरा, आपले ॠतू, आपले सण, एवढेच नाही तर एखाद्या आवडलेल्या पुस्तकाबद्दलची माहिती, वेगवेगळ्या देशाची माहिती, आपण साजरे करतो ते प्रत्येक दिवस, त्यांचे महत्व…अशी ज्ञानगंगा खुप वाढत गेली. वाढतच आहे.वाढतच राहो.

आज आपलं हे पोर्टल तीन वर्षे पूर्ण करत चौथ्या वर्षात प्रवेश करत आहे.
आज आपल्या पोर्टलचा तिसरा वर्धापन दिवस.
अलका आणि देवेंद्र भुजबळ दांपत्याचे किती मानू आभार.
आम्हाला लिहित केलं.
आम्हाला वाचक केलं.
अनेक विषयांवर समृद्ध केलं.
अलका, देवेंद्र, देवश्री भुजबळ यांना व सर्व लेखकांना, वाचकांना आपल्या या वेब पोर्टल ‘वर्धापन’ दिनाच्या अनेक, अनेक शुभेच्छा आणि नविन उपक्रमासाठी अनेक मनापासून सदिच्छा.

पूर्णिमा शेंडे.

— लेखन : सौ पूर्णिमा शेंडे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

5 COMMENTS

  1. Kaku atyant uttam lihita tumhi specific ashi nahi mala tumchya saglya kavita far avdatat
    Sahaj sopya vinodi pan manavar goad athvanincha theva theun jatat mala far garav ahe mala tumcha sahvas Ani margadarshn milta
    Uttam kavita uttam lekhan

  2. आमची पौर्णिमा …खंरच खुपच छान कविता व लेख लिहते..आमच्या सर्व बहिणींमध्येंच ‘ती’ खास आहे ! बसल्या बसल्या छान छान सुचतं..बर्‍याच काही विषयांवर अगदी अचूक वर्णन करून..शब्दांत व्यक्त करते! ही “कला ” फक्त तिच्याकडे आहे..याचा मला खुपच अभिमान वाटतोय..अशीच तुझी प्रगती होवोत हीच इच्छा!🙏🏻👍🏻

  3. Webportal चालू केल्याबद्दल भुजबळ कुटुंबाचे आभार. पूर्णिमा शेंडे यांच्या कविता आणि लेख खरोखरच वाचनिय व सुरेख असतात.!

  4. News story portal वर आणि ते अथकपणे चालू ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या भूजबळ कुटुंबाचे सुरेख चित्रण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments