आयुर्वेद आणि व्याधीक्षमत्व
स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने धन्वंतरी जयंतीला (धनत्रयोदशीला) आयुर्वेददिन म्हणून संबोधित केले आहे. हा आयुर्वेदाचा यथोचित गौरवच म्हणावा लागेल.
सध्या हिवाळा चालू आहे, आयुर्वेदात यालाच विसर्गकाल म्हणतात. अर्थात आपली प्रतिकारशक्ती वाढविण्याचा हाच योग्य काल आहे. म्हणून आपण त्याविषयी विशेष जाणून घेणार आहोत.
ह्या २ वर्षात करोनाच्या धूमाकुळामूळे आपण व्याधीक्षमत्व, प्रतिकारशक्ती ह्या विषयांच्या जास्त जवळ गेलो आहोत. त्याचा प्रकर्षाने विचार करत आहोत.
व्याधीक्षमत्वाचा विचार करताना प्रामुख्याने २ गोष्टींचा विचार करावा लागेल –
१)व्याधीबलविरोधीत्वम
२)व्याधीउत्पादप्रतिबंधकत्वम्
निदानपरिवर्जनम. स्वस्थवृतविधीपालन
आज आपण व्याधीबलविरोधीत्वम अर्थात व्याधीक्षमत्व या गोष्टीचा विचार करणार आहोत –
व्याधीक्षमत्व ——— —-। ।
सहज/जन्मजात. कालज/युक्तीकृत
जन्मजात व्याधीक्षमत्व आपल्या आईवडीलांकडून प्राप्त होते व युक्तीकृत (acquired) व्याधीक्षमत्व आपल्याला योग्य आहारविहार, दिनचर्या, रूतूचर्यापालन इत्यादींनी प्राप्त करून घेता येते.
व्याधीक्षमत्वाचा विचार करताना व्याधी उत्पन्न कशी होते याचा विचार करणे जास्त आवश्यक आहे.
शरीरातील दोष, धातू, अग्नी, मल इ. समानता, प्राकृतता तसेच आत्मा, इंद्रीय आणि मन यांची प्रसन्नता शरीराला निरोगी ठेवते. या सर्वांमधील विजातीयता अर्थात बिघाड व्याधी निर्माण करतो.
अहीतकर आहार -विहारादीच्या सेवनाने प्रत्येक वेळी व्याधी निर्माण होईलच असे नाही. शरीर-मनाची व्याधीक्षमत्वता व्याधी निर्मितीस अटकाव करतात.
व्याधी निर्मितीमध्ये तसेच व्याधीक्षमत्वांवर पुढील गोष्टींचा परिणाम होत असतो.
१) देश
२) काल
३) संयोग
४) प्रमाण
५) वीर्य
६) अतियोग
पुढील भागात आपण याविषयी सविस्तर पाहू या …
तो पर्यंत स्वस्थ रहा
– मस्त रहा 😄😊

– लेखन : डॉ स्वाती दगडे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
