Home बातम्या आपले सण : आवाहन

आपले सण : आवाहन

0

नमस्कार मंडळी.
आज सगळीकडे आनंदीआनंद आहे. कारण आज आपण सर्व मिळून रंग खेळतो, एकमेकांना मस्त रंगवतो. त्यामुळे असावे बहुधा, पण आजच्याच दिवसाला सरसकट रंगपंचमी म्हटल्या जाते.

खरी रंगपंचमी होळी च्या पासून पाचव्या दिवशी असते. म्हणून तर तिला पंचमी म्हणतात.
पण धुळवड च रंगपंचमी म्हणून साजरी करण्यात येते. अर्थात अजून ही काही ठिकाणी, गावांमध्ये पंचमीलाच रंग खेळतात, हे विशेष!
आजच्या, धुली वंदन च्या दिवशी आदल्या दिवशी पेटवलेल्या होळी ची रक्षा एकमेकांना पूज्य भावाने अंगारा म्हणून लावणे, असे मूळ स्वरूप होते. असो…

या निमित्ताने आपल्या पोर्टल तर्फे असे आवाहन करण्यात येत आहे की, ज्या जाणकार व्यक्ती आपल्या सणांचे मूळ उद्देश, स्वरूप, महत्व या विषयी लिहू शकतील त्यांनी त्यांचे ज्ञान सर्वांपर्यंत अवश्य पोहोचवावे, जेणे करून हे सर्व सण वर वर, उथळपणे, सवंगपणे साजरे न होता अधिक गांभीर्याने, खऱ्या खुऱ्या स्वरुपात साजरे होऊ शकतील.

आज हिंदु संस्कृती झपाट्याने जगभर पसरत आहे. ७ देशांचे राष्ट्र प्रमुख हे मूळ हिंदू वंशांचे आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या, उपक्रम वगैरे यांचे प्रमुख ही मूळ हिंदू वंशांचे आहे.
जग भर जाणाऱ्या भारतीयांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे असे लिखाण हे जागतिक पातळीवर महत्वाचे ठरेल.

मात्र आपले लिखाण हे संबधित सणांच्या किमान एक आठवडा आधी मिळाले पाहिजे. जेणे करून त्या माहितीच्या आधारे प्रत्यक्ष सण त्या प्रमाणे साजरे करता येऊ शकतील.

आपल्या मजकुरा सोबत आपला अल्प परिचय, असल्यास अनुषंगिक छायाचित्रं आणि आपली पासपोर्ट आकाराची दोन तीन छायाचित्रे मिळू शकल्यास उत्तम.

आपण सर्व मिळून हा उपक्रम यशस्वी करू या.
आपला
देवेंद्र भुजबळ
संपादक www.newsstorytoday.com
☎️ +919869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version