Friday, October 18, 2024
Homeपर्यटनआमची युरोप ट्रीप :10

आमची युरोप ट्रीप :10

23 जून ला Skansen midsummer festival बघायचे ठरले. दुसर्‍या दिवशी हि मला अशक्त पणा जाणवत असल्याने मी घरीच थांबायचं ठरवले. मात्र प्रशांत ला मुलांबरोबर जाऊन तू तरी इथल्या सणाचा आनंद घे म्हणून पाठवले. कारण त्यांना 25 तारखेला परत मुंबईची फ्लाइट होती. कामामुळे जास्त दिवस राहणे शक्य नव्हतं. मी आणि ईश्वरी पुढे अजून 15 दिवस थांबणार होतो.

चिराग ला प्रशांत निघायच्या आधी त्याच्या आवडीनुसार H&M मधून कपडे घेऊन द्यायचे होते. म्हणून त्याला मी अक्षरशः मुलांबरोबर जायला लावले. नाहीतर तू एकटी कशी काय घरात थांबशील अस सारखे चालू होते. म्हटल मला काही वाटल तर समोर राहणार्‍या मराठी कुटुंबाची मदत घेईन असे सांगितले. मग तयार झाला 😇

Skansen midsummer festival मध्ये भरगच्च activities होत्या. ह्याच आयोजन djurgården परिसरात होते. स्वीडन मध्ये ठिकठिकाणी midsummer festival आयोजित करतात. पण Skansen midsummer festival हा तिथला आयोजित करण्यात आलेल्या फेस्टिवल पैकी सर्वात मोठा आयोजक आहे. हा फेस्टिवल ते तिथल्या उन्हाळ्यातील मोठे दिवस म्हणून 23 te 25 जून साजरा करतात. त्या वेळी तिथे नॅशनल हॉलिडे असतो.

तिथे इतर वेळी वर्षातील जवळ जवळ 6/7 महिने बर्फ असतो व दिवसा सूर्य प्रकाश व पर्यायाने उजेड फारच कमी वेळ असतो. त्यामुळे हे दिवस अगदी उत्साहाने सणांसारखे साजरे केले जातात. Vitamin D अश्या पद्धतीने बाहेर च्या activities मधून मिळविण्याचा हा एक शास्त्र शुद्ध प्रयत्न असतो. 😊 Christmas इतकाच हा एक स्वीडन मधला प्रसिद्ध सण आहे.
नाचगाणी व खेळ आयोजित केले जातात. तिथले पारंपरिक लोक नृत्य (folk dance) maypole च्या अवतीभवती फिरून करतात ते प्रसिद्ध आहे.

ह्या दिवसात वेगवेगळ्या प्रकारची फुले हि उमलतात. त्यामुळे फुले व पाने वापरून मुकुट व ड्रेस बनवणे असेही खेळ असतात व त्यात चांगले बनवणार्यांना बक्षीस हि दिले जाते. ह्यात अगदी लहानां पासून वयोवृद्धां पर्यंत सर्वजण आवडीनी भाग घेतात. कुटुंब व मित्रमंडळी ह्यांच्या सोबत ह्या निमित्ताने छान वेळ घालवतात. मी इथल आनंदमयी वातावरण मुलांनी केलेल्या वर्णनातून अनुभवले 😇.

चिराग लाही तिथे त्याचे काही मित्र भेटले. सर्वानी एकत्र छान मज्जा केली. मग मोर्चा वळला H&M च्या Drottninggatan street जवळच्या दुकानात. तिथे प्रशांत बरोबर ईश्वरी नी पण थोडी खरेदी😁 म्हणजे 2/3 ड्रेस 😂 घेतले. ते सुद्धा पप्पांच्या बॅग मध्ये पाठवून देता येतील. आपल्याला कमी ओझ होईल या उदात्त हेतूने 😁. गुणी माझी बाय ती 😆

मुलं आणि प्रशांत सकाळी 10 वाजता निघाले आणि संध्याकाळी 6.30 /7 पर्यंत परत आले. मी दिवसभर घरात मस्त आराम केला. मग 4 वाजता आवरून संध्याकाळ च्या जेवणाची तयारी करून ठेवली. समोरच्या मराठी कुटुंबाला आल्यापासून भेटले नव्हते. म्हणून मग 5/5.30 च्या आसपास चिराग साठी करून नेलेला फराळ, गुलाबजाम असा खाऊ प्लेट मध्ये भरून नेऊन देवून त्यांच्या बरोबर परिचय करून घेतला.

त्या पण म्हणाल्या की एवढे दिवस झाले आम्ही वाट पहात होते की चिराग कधी ओळख करून देतोय ?😊 त्यांना सांगितल आल्या पासून सारखे हिंडतोय त्यामुळे तुमच्या बरोबर बोलायला वेळ मिळाला नाही. रश्मी च माहेर सोलापूर व सासर चिंचवड. त्यांचा मुलगा रुद्र आता तिथे 3rd std मध्ये आहे. नवरा बायको दोघेही Scania मध्ये च जॉब करतात. थोडा वेळ गप्पा मारल्या.

मग दुसर्‍या दिवशी संध्याकाळी सर्वानी एकत्र सोसायटी समोर च्या हिरवळी वर च्या table व बेंच वर बसून चहा नाश्ता करायच ठरवले. काय भारी feeling आले म्हणून सांगू 😄
एवढ्या लांब आपल्या भाषेत बोलणारे शेजारी आणि त्यांच्या बरोबर स्नेह नाश्ता 😅.

मुलं आणि हे यायच्या आधी भाजी आणि वरण भात बनवला. आल्यावर सर्व दमलेले असल्याने लवकर फ्रेश होऊन जेवून ताणून दिली. त्याआधी खरेदी मात्र आठवणीनी दाखवली हे विशेष 😁.

लवकरच परत भेटूयात आमच्या स्वीडन च्या मराठी शेजार व 24 तारखेच्या वृत्तांता सह.

— लेखन : सुप्रिया सगरे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. खूप सुंदर सुप्रिया ताई.. मला माझी दार ए सलाम मधली मराठी शेजारीण भेटली तो प्रसंग आठवला.. ओघवती भाषा आहे अगदीं तिथे असल्यासारखे वाटते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on चलो, अमरावती !
वर्षा महेंद्र भाबल on आनंदी जीवनाची गुरुकिल्ली
सौ.मृदुलाराजे on विजयादशमी
सौ.मृदुलाराजे on चलो, अमरावती !
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था , महाराष्ट्र. on गुरूंच्या आठवणी
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” :  १०
डॉ. प्रशांत भुजबळ on अभिनव टपालदिन