नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे ? हसताय ना !😃 मागचा भाग व ह्या लिखाणात तसा बराच खंड पडला. पण मी परत आठवणींच्या सफर मधून तुम्हाला पुढची सफर घडवून आणते.
24 जून ला आम्ही घरी च थांबायचे ठरवले होते. कारण 25 तारखेला प्रशांत ची परतीची फ्लाइट होती. शिवाय शनिवार, रविवार असल्याने चिराग ला पण सुट्टी होती. मग आरामात उठून आवरून नाश्ता केला.
आदल्या दिवशी संध्याकाळी लाँड्री केली होती. त्या कपड्यांच्या घड्या घालून आम्हाला नको असणार / न लागणारे सामान आम्ही (मी आणि ईश्वरी 😜) नी प्रशांत च्या बॅग मधे ठेवायला दिले. म्हणजे आम्ही दोघी अजून खरेदी करायला मोकळ्या 🤣(लई च जीवाच स्टॉकहोम केले ! 😜) हि सर्व कल्पना लेकी च्या सुपीक डोक्यातून आलेली… 😃
बॅग भरून झाल्यावर जेवणाची तयारी केली. तेवढ्यात चिराग डोक्याला तेल लावून दे म्हणुन पाठीमागे लागला. आणि त्या बरोबर ईश्वरी पण. 😅मग म्हटले, तुमच्या दोघांना हेड मसाज करुन दिल्यावर तुम्ही दोघांनी मला फूट मसाज करायचा. हा आमचा करार होत असताना प्रशांत नी 2 वर (मुलांवर) एक फ्री (म्हणजे तो स्वतः) अशी हेड मसाज साठी ची स्कीम स्वतः साठी लागू करून घेतली 😂 म्हटले, देते करून बाबा. तू पण काय लक्षात ठेवशील. तर गालातल्या गालात हसत मुलांचे होई पर्यंत ऑफिसचे काम करत बसला. 😇
तिघांना हेड मसाज करुन झाल्यावर आधी जेवावं की फूट मसाज करावा असा प्रश्न मनातच विचारला. तो ओठावर येवू द्यायचे धाडस केले नाही कारण मग मला नंतर फूट मसाज मिळेल की नाही ह्याची शक्यता वाटत नव्हती 😁 पोर जोपर्यंत भूक लागली म्हणत नाहीत तोपर्यंत गप फूट मसाज करून घ्यायचे ठरवले 😆 चिराग म्हणाला बघ तू दोन मूल जन्माला घातली तर त्याचा कसा फायदा होतोय 🤷♀️. एकाच वेळी दोन्ही पायाच्या तळव्यांना मसाज मिळतोय 😂 हे ऐकून माझे मलाच धन्य वाटले. 🤣🤣 त्या धन्यते मध्येच छान झोप लागली 😄(असे कधी हि झोपण्याचे सुख काही औरच असते 😆)
तोपर्यंत मग प्रशांत नी पॅकेट मिसळ (चित्रा कडून घेतलेली) बनवली. पाव तर आणलेच होते. ईश्वरी नी कांदा चिरला. भात तर आधीच cooker ला लावला होता. आणि गोडाचं म्हणून इकडून बनवून नेलेले गुलाबजाम होतेच. सर्व झाल्यावर मला जेवणासाठी उठवले. मस्त ट्रीप च्या गप्पा मारत जेवण झाले. ईश्वरी आणि चिराग नी मिळून भांडी घासली. तोपर्यंत मी परत झोप काढली 😅. प्रशांत परत काम करत बसला हे पाहून चिराग नी त्याला सांगितले, काय हे पप्पा, तिकडे गेल्यावर काम आहेच. आता जरा आमच्या बरोबर गप्पा मारा. (मुलांनी असे गोड रागावण्याचे सुख हि फार छान असते 😇) तोपर्यंत दुपारचे 3 वाजले होते. मग दोन्ही आजी, मावशी, आत्या ह्यांना video कॉल करायचे ठरवले. Video कॉल वर चिरागचे घर सर्वांना दाखवून ख्यालीखुशाली विचारून झाली. सर्वांशी बोले पर्यंत 5 वाजले.
मग फ्रेश होऊन चहा घेऊन अपार्टमेंट समोरच्या बेंच वर बसायला गेलो. आमच्या समोरच्या मराठी शेजाऱ्यांना पण तिथेच या म्हणून सांगितले. त्यांचा मुलगा रुद्र जो आता तिथे तिसरीत आहे तो स्कूटर चालवत होता आणि आमच्या मस्त गप्पा चालू होत्या. उन्हाळ्यात तिथे अंधार लवकर होत नाही त्यामुळे किती वेळ गेला समजले नाही. पण 7.30 च्या आसपास लक्ष्यात आले की स्वैपाक राहिलाय, म्हणताना गप्पा आटोपत्या घेऊन किचन मध्ये घुसले. दुसर्या दिवशी च्या नाश्त्याची पण तयारी करून ठेवली. कारण दुसर्या दिवशी सकाळी नाश्ता करून प्रशांत ला Arlanda airport ला सोडवण्यासाठी जायचे होते. त्यामुळे पटकन जेवण झाल्यावर भांडी घासून लवकर झोपलो. त्याला airport वर सोडवून आम्ही तिघांनी एका ठिकाणी जायचे ठरवले होते. त्यामुळे त्या तयारीत निघायचे होते.
लवकरच दुसर्या दिवशी काय काय धमाल झाली व केली ते पुढच्या भागात माहित करुन घेऊया. तोपर्यंत मस्त हसा, स्वस्थ्य रहा 😃

— लेखन : सुप्रिया सगरे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूप सुंदर as usual ❤️👍