Friday, December 27, 2024
Homeपर्यटनआमची युरोप ट्रीप : 12

आमची युरोप ट्रीप : 12

मागच्या भागापर्यंत आपण शनिवार 24 जून पर्यंतची सफर अनुभवली. 25 जूनला रविवारी सकाळी आम्ही सर्वांनी सकाळी लवकर उठून आवरून नाश्ता केला व बरोबर डब्यात पण घेतला. आम्हाला 12/12.30 पर्यंत Arlanda airport ला पोहोचायचं होते. त्यासाठी आम्ही 9 वाजताच घरातून निघायचे ठरवले.

खरे तर प्रशांत नी पण अजून आमच्या बरोबर रहावे असे खूप वाटत होते. पण त्यांना महत्वाची कामे असल्याने ते शक्य नव्हतं. त्याच्या चेहर्‍यावर लेका बरोबर रहायला मिळाल्याचे समाधान मात्र दिसत होते. आणि आम्ही ठरवलं होतं की कुठेही अति भावनिक व्हायचे नाही. जो वेळ एकत्र मिळतोय तो छान आनंदाने घालवायचा. देव कृपेने सर्व व्यवस्थित आहे तर उगीच डोळ्यात पाणी आणायचे नाही. माझे तर असे स्पष्ट म्हणणं आहे की “कायम हसतमुख राहणार त्याला देव सुखी ठेवणार 😃” (जसे साखरेचे खाणार त्याला देव देणार तसे हि खास सुप्रिया स्पेशल म्हण 😄)

आम्ही घरातून बाहेर पडलो पण किंचित उशीर झाला आणि Södertälje Centrum (सौदेतेलिया सेंट्रम – सेंट्रल ला सेंट्रम म्हणतात) ची बस आमच्या समोर निघून गेली. रविवार असल्याने पुढची बस अर्धा तासाने होती. एवढा वेळ थांबण्यापेक्षा चिराग आम्हाला चालत एका शॉर्ट कट नी स्टेशन पर्यंत घेऊन गेला. चालत आम्ही 15 मिनिटांत पोहोचलो. आमची मस्त Södertälje ची चालत सफर झाली. तिथे गेल्यावर पण आम्हाला Märsta (मैरस्ता – ह्यातल्या a umalute युमॅल्युट च उच्चारात फरक आहे) स्टेशन पर्यंत जाणारी Uppsala (उप्पसाला) ची ट्रेन 15 मिनिट थांबल्यानंतर मिळाली. अजून उशीर झाला तर टॅक्सी घ्यायची ठरवले होते पण नशिबाने वेळेत (10 वाजता) ट्रेन मिळाली. Märsta स्टेशन ला पोहोचायला आम्हाला 11.30 झाले. तिथून पुढे Airport पर्यंत जायला आम्हाला एक बस घ्यायची होती.

बस स्टॉपवर बस ची वाट बघत असताना बघितले की अगदी airline चा स्टाफ पण (पायलट, इन फ्लाइट crew members) सार्वजनिक वाहतूक सेवा वापरतात. कारण तिथे टॅक्सी सेवा तशी महाग आहे. आणि सार्वजनिक वाहतूक सेवा चांगली व परवडणारी ही आहे. माझ्या शेजारीच स्टॉप वर Scandinavian airline ची air hostess बसली होती. मी बसल्या बसल्या तिच्याशी गप्पा मारायला चालू केल्या. तीने पण छान प्रतिसाद दिला. तिची duty त्या दिवशी Helsinki bound flight ला होती. आणि त्याच दिवशी ती रात्री उशिरा परत येणार होती. मग 3 दिवस off असे सांगितले. मग मी तिला विचारले की रात्री उशिरा आल्यावर पण ती पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरते का? तिला ते odd hours ला वापरण्यात सेफ वाटते का? तेव्हा ती म्हणाली की तसा काही प्रॉब्लेम नाही. But it is always better to be cautious and alert. (हे तर जगात सगळीकडे लागू होते असे वाटते) पण मुंबई मला त्यातल्या त्यात खूप सुरक्षित वाटते. (चान्स मिळाला की इंडिया कसे छान आहे हे सांगायचे असते. शास्त्र असते ते 😄) आणि हे मी तिला सांगितले पण की you will not feel unsafe to travel at odd hours in Mumbai. If you get a chance to fly to Mumbai, you will experience and explore it. Though Scandinavian airline is limited to serve in Scandinavian countries. So may be if you choose to serve in some other international airline. हे तिला सांगायला मी अजिबात विसरले नाही! 😅

15 मिनिटांत आम्हाला airport साठी बस मिळाली आणि पुढच्या 15 मिनिटात म्हणजे 12 वाजता आम्ही Airport ला पोहोचलो. वेब check in केले असल्याने त्या काऊंटर ला जाऊन पटकन चेक इन baggage देऊन बोर्डिंग पास घेतला. चिराग चा अजून एक मित्र विवेक पण त्याच्या आई वडीलांना सोडवण्यासाठी तिथे आला होता. त्यांची पण दुबई पर्यंत तीच फ्लाइट होती. नंतर ते बंगलोर च्या व प्रशांत मुंबई च्या फ्लाइट साठी बोर्ड करणार होते. आम्ही एकत्र बसुन बरोबर आणलेला tiffin खाल्ला. मग थोडा वेळ गप्पा मारून फोटो काढून झाल्यावर 12.45 ला प्रशांत व विवेक चे आई वडील इमिग्रेशन साठी आत गेले. त्यांना see off केल्यावर आम्ही तिघे आणि विवेकने मॅक डोनाल्ड मध्ये जाऊन खाल्ले . विवेक पण थोडा emotional झाला होता (त्याचे आई वडील महिना भर त्याच्या बरोबर होते) त्याला आमच्या बरोबर Sigtuna ला चल म्हटले आणि तो पण तयार झाला. कारण घरी गेल्यावर त्याला एकदम एकटे वाटायला नको म्हणून.

Airport वर फ्रेश होऊन आम्ही परत Märsta स्टेशन साठी बस घेतली. Märsta स्टेशन हून Sigtuna साठी बस घेतली. अगदी 15/20 मिनिटे लागतात पोहोचायला. Sigtuna हि स्वीडन मधील सर्वात जुनी वसाहत मानली जाते. तेथील उत्खननात स्वीडन मधील सर्वात जुने नाणी व इमारती चे अवशेष सापडले अस म्हणतात. Swedish king Eric यांनी 980 AD मध्ये ह्या शहराची स्थापना केली. हे खूप छान टाऊन आहे. लेक malaren चा उत्तर भाग इथे संपतो. हे शहर व आसपास 7 चर्च आहेत. जवळ एक Skokloster Castle पण आहे. आजूबाजूला डोंगरात दाट झाडी व लेक चा नजारा असलेली हि वस्ती खरच खूप छान निसर्ग सौंदर्याने नटलीय. शिवाय इथे एक खूप छान संग्रहालय आहे जे रविवारी आम्ही गेल्यामुळे बंद होते. लेक च्या कडेला खूप छान बगीचा आहे जो एक ते दोन किलोमीटर लांबीचा आहे. त्या रस्त्यावरून रमत गमत चालत, निसर्गाची किमया अनुभवायला फार छान वाटल. ठिकठिकाणी बाकडे आहेत. लहान मुलांना खेळायला खेळणी आणि हिरवळ आहे. मी एके ठिकाणी हिरवळीवर थोड्या वेळ झोपून पण घेतले 😁. मस्त झाडाच्या सावलीत, लेक कडून येणार्‍या वाऱ्याची मंद झुळूक आणि शांतता मुळे मस्त डुलकी घेतली. इथे Jogging व cycling ट्रॅक आहे. अतिशय नयनरम्य ठिकाण आहे. शिवाय भरपूर कॅफे, भेटवस्तू ची दुकाने, रेस्टॉरंट हि आहेत. आमच खावून झाल होत त्यामुळे आम्ही मस्त भटकंती केली आणि नंतर तिथले स्पेशल Sigtuna gelato (ice cream) घेतले. हि तिथली speciality आहे. आणि खरच खूप छान आणि fulfilling आहे.

मग तिथला टाऊन हॉल बघून एक फोटो सेशन करून Märsta ला जाण्या साठी बस स्टॉप वर थांबलो. तोपर्यंत 4.45 झाले होते. Märsta ला पोहोचून Södertälje Centrum ची ट्रेन घेतली जी via स्टॉकहोम जाते. त्यामुळे विवेक स्टॉकहोम Centrum ला उतरला. आम्हाला घरी पोहोचायला 7 वाजले. फ्रेश होऊन जेवून लवकर झोपायचे ठरवले कारण दुसर्‍या दिवशी सोमवार पासून चिराग ला ऑफिस मध्ये जायच होत.

पुढील 15 दिवसात ऑफिस ला जावून पण चिरागने जमेल तेवढे आम्हाला भरपूर फिरवले. त्याच वर्णन आपण पुढील भागात लवकरच वाचू या. तो पर्यंत स्वस्थ आणि मस्त रहा. 😇

— लेखन : सुप्रिया सगरे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !
आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९