Friday, December 27, 2024
Homeपर्यटनआमची युरोप ट्रीप 14

आमची युरोप ट्रीप 14

आमची युरोप ट्रीप 14

मागच्या भागात आपण 26, 27, 28, 29 जून कसा व्यतीत केला त्याचे वर्णन वाचले.

30 जून च्या शुक्रवारी लेकाचे मित्र घरी जेवायला बोलावले होते. लेक सकाळी लवकर आवरून ऑफिस मध्ये गेला पण लवकर घरी येईन म्हणाला. मी आणि लेकीने आवरून नाश्ता करून
स्वैपाकाच्या तयारीला लागलो. त्याच बरोबर घराची साफसफाई पण केली. फक्त हॉल ची साफसूफ लेक आल्यावर करणार होता.

दुपारी आम्ही दोघी जेवलो तोपर्यंत लेक घरी आला. त्यानी ही जेवण झाल्यावर हॉल आवरायला चालू केले. लेक मला स्वैपाकघरात आणि दादा ला हॉल मध्ये असे दोन्ही ठिकाणी मदत करत होती. माझ्या सूचनेनुसार हॉल मधील वस्तूंच्या जागा पण बदलल्या.

आम्ही तिघे पकडून सगळे 9 जण असणार म्हणून त्या प्रमाणे मसाले भात आणि खपली गहु च्या दलिया ची गूळ घालून खीर केली. त्यावर मस्त सुका मेवाने सुशोभित केले 😃. जरा जास्तच बनवले म्हणजे मुलांना व आम्हाला पण दुसर्‍या दिवशी नाश्त्याला होईल असा विचार करून 😁) सॅलड कट करे पर्यंत मुलं घरी आली. तेवढ्यात प्रशांत चा व्हिडिओ कॉल आला. ते पण सर्वांशी बोलले. मुंबईत एकटे असल्याने त्यांना आमची फार आठवण येत होती. दुसर्‍या दिवशी त्यांना IIM अहमदाबाद येथे 15 दिवस जायचे होते म्हणून बरे झाले 😅 म्हणजे परत व्यस्त होणार होते.

विवेक, विराज, माहीर, भैरव, समृद्धी सगळे साधारण 7 पर्यंत आले. आल्यावर सर्वांना ज्यूस दिला. अक्षता ला यायला वेळ होता म्हणून ती येईपर्यंत आरामात गप्पा मारत बसलो. हुसेन ला मात्र त्या दिवशी यायला जमलं नाही. मुलं गप्पा मारत बसली तोपर्यंत मी समोरच्या रुद्र साठी खीर देवून आले. फार बोलका आणि गोड मुलगा आहे रुद्र. आम्ही एवढे कमी दिवस होतो तरी तेवढ्या वेळात आमची त्याच्या बरोबर छान गट्टी जमली. 😇

अक्षता ला यायला 8 वाजले. मग जेवायला बसलो. सर्वांना जेवण व गोडाचे आवडले. मनसोक्त व आरामात खा म्हटले. जेवण झाल्यावर मुलांनी आवरायला पण मदत केली. भैरव आणि विवेक नी मिळून पटकन भांडी घासून घेतली. आणि परत सगळे गप्पा मारत बसलो.

आमच्या गप्पा तिथली परिस्थिती (सामाजिक, हवामान, कार्यालयीन कामकाज पद्धत, आंतरराष्ट्रीय राजकारण इत्यादी अनेक विषय) व आपली मुलं त्याला कसे सामोरे जातात ह्यावर मस्त चर्चा झाली. आणि परिस्थितीचे भान ठेवून स्वतः ला सिद्ध करण्यासाठी झटत आहेत हे पाहून खूप समाधान वाटले.
देवाकडे सर्वांच्या प्रगतीची व सुरक्षिततेची प्रार्थना केली. 😇

मित्रांनी लेकाला हवामान अंदाजानुसार शनिवारी आम्हाला djurgården दाखवून घे आणि रविवारी पाऊस आहे तेव्हा मॉल मध्ये जा असे छान सजेशन दिले 😇

10 च्या आसपास मुलं निघाली. भैरव, माहीर चिराग च्या जवळ राहतात. तर विराज, विवेक, समृद्धी, अक्षता स्टॉकहोम मध्ये. त्यामुळे त्यांना निघावं लागले. निघताना उरलेला मसाला भात व खीर मुलांना दुसर्‍या दिवशी नाश्त्याला होईल म्हणून डब्यात घालून दिले. आणि उरलेले (तरी भरपूर होते जे आम्हाला दुसर्‍या दिवशी दोन्ही वेळे साठी पुरणार होते 😅). आमच्या साठी फ्रीज मध्ये ठेवून दिले.

अक्षता जरा उशीरा आल्याने ईश्वरी बरोबर गप्पा मारायला थांबली. तिचं व ईश्वरीचं एकच क्षेत्र असल्याने ईश्वरी ला तिला तिथे तिच्या विषयाशी संबंधित अभ्यासक्रम व नोकरीच्या दृष्टीने कसे आहे ह्याची माहिती पाहिजे होती. त्या दोघींना बोलता बोलता पावणे अकरा झाले. मग मात्र लेक स्वतः हून तिला सोडविण्यासाठी स्टेशन वर गेला. मला त्याचे हे स्वतः हून दाखवलेले सौजन्य फार आवडल आणि मी दिलेल्या संस्कारांवर विश्वास बसला.

अक्षता नी मला सांगितलेला किस्सा इथे नमूद करावासा वाटतोय. ज्या वेळी अक्षता पहिल्यांदा स्टॉकहोम मध्ये तिचं सर्व सामान घेऊन student accommodation building जवळ पोहोचली होती त्यावेळी तिच्या कडे भरपूर सामान होते. आणि एकटीच ते घेऊन जाताना दमली होती. तिथे चढ खूप आहे. तेवढ्यात चिराग, पार्थ आणि भैरव Lapis बीच वरुन पोहून सायकल वर येत होते. त्यांनी बघितले हि सामान ओढतेय पण तिच्याने होत नव्हते. त्यांच्या मध्ये जोक पण झाला की देख भाई गरीब बिचारी इंडियन कैसे सामान खीच रही है 😅. मग ह्या मुलांनी तिला सामान तिच्या रूम पर्यंत न्यायला मदत केली. सामान ठेवताना तिनी विचारले की तुझे नाव चिराग आहे का? तो एकदम आश्चर्य चकित झाला की हिला तर पहिल्यांदा भेटतोय हिला नाव कस काय माहीत. मग नंतर उलगडा झाला की चिराग student ambassador म्हणून भारतीय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचा त्यामुळे तिला तो माहित होता. पण खूप लोकांना तो मार्गदर्शन करत असल्याने त्याला सर्व जण लक्षात नव्हते. (असे चिराग नी खूप मित्र बनवले.)

नंतर भैरव च्या रूम च्या मजल्यावर च्या किचन मधे (तिथे student accommodation मध्ये एका मजल्यावर एक कॉमन किचन असते) चहा ला पण बोलवलं. ती मला म्हणाली की तिला ते फार छान वाटले. तिला चिराग खूप सोशल आणि मदत करणारा मुलगा आहे हे जाणवले.

तिला स्टॉकहोम च्या ट्रेन मध्ये बसवून आला. तसे उन्हाळा असल्याने 10.30 /11 पर्यंत तिथे उजेड असतो म्हणून काळजी नव्हती. मी तिला तिच्या रूम मध्ये पोहोचली की मेसेज कर म्हणून सांगून ठेवले होते.

लेक परत येईपर्यंत आम्ही दोघींनी उरलेले आवरलं आणि दुसर्‍या दिवशी च्या फिरण्यासाठी (ड्रेस कोणता घालायचा वगैरे म्हणजे फोटो छान आले पाहिजे 😄) तयारी करून ठेवली. आणि मग लेक आल्यावर गप्पा मारत बसलो. तोपर्यंत अक्षता चा साधारण पणे 12.15 ला तिच्या रूम मध्ये पोहोचल्या चा मेसेज आला. मग आम्ही झोपलो.

प्रशांत मागच्या ऑक्टोबर मध्ये लेकाला भेटायला गेले तेव्हा त्यांनी Djurgården बघितले होते. त्यामुळे ते असताना लेकानं आमच्या एकत्र फिरती मध्ये ते अँड केल नव्हत (very thoughtful planning 😘)

लवकरच भेटूयात djurgården च्या सफर मध्ये. 😊

— लेखन : सुप्रिया सगरे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !
आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९