Monday, July 14, 2025
Homeपर्यटनआमची युरोप ट्रीप : 7

आमची युरोप ट्रीप : 7

मागच्या भागात आपण Helsinki मध्ये पहिल्या दिवशी काय काय बघितले, कुठे फिरलो ते वर्णन वाचले. मागच्या भागाच्या लिखाणात व ह्या लिखाणात तसा भरपूर खंड पडला पण आता आपण पुढील सफरीचा आनंद ह्या पुढील भागांच्या वर्णनातून अनुभवू या. 😊

20 तारखेला सकाळी आवरून नाश्ता करून तयार झाल्यावर सर्व सामान व्यवस्थित पॅकिंग करून केर टाकून अपार्टमेंट लॉक करून चावी खालच्या माळी कम वॉचमन (तसे आमचे ठरले होते अपार्टमेंट owner कंपनी बरोबर) कडे देवून आम्ही Helsinki Central ला गेलो. हे सर्व करताना आम्हाला 11.30 झाले. तिथे सर्व सामान लॉकर रूम मध्ये ठेवून आम्ही Helsinki ची oodi Helsinki Central library (सार्वजनिक वाचनालय) बघायला गेलो.

Helsinki Central पासून हे वाचनालय चालत अवघ्या 5 ते 10 मिनिट अंतरावर आहे. ह्या इमारतीचा स्थापत्य आराखडा /रचना फार वेगळी आणि सुंदर आहे. म्हणजे ती इमारत वाचनालय आहे असे वाटत नाही.

ही तीन मजली इमारत आहे. पण ceiling height (छताची उंची) प्रत्येक मजल्याची कमीत कमी 25 ते 30 फूट असावी. ह्या इमारती च्या आवारात बाहेर बसायला जागा आहे जी इमारती च्या तिसर्‍या मजल्यावरील बाल्कनी (सज्जा) मुळे झाकली जाते. हा सज्जा भरपूर मोठा आहे. ह्या सज्जाला तिसर्‍या मजल्यावर एंट्री आहे व तिथे एक कॅफे आहे. शिवाय समोर मोकळे पटांगण आहे जिथे मुलं स्केटिंग चा सराव करताना दिसली.

वाचनालयाच्या तळ मजल्याला समोरच्या बाजूला पूर्ण पारदर्शक काचा आहेत. आत गेल्या गेल्या काही सोफा व टेबल लावलेले आहेत. इथे खूप लोक बसुन बुद्धिबळ खेळत होते. त्या भागाच्या पलीकडे पुस्तके सेक्शन प्रमाणे लावलेली आहेत. प्रत्येक मजल्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांची मांडणी केली आहे. म्हणजे लोक त्या त्या प्रमाणे त्या त्या मजल्यावर जावून आवडीची पुस्तके वाचतात.

आम्ही लिफ्टने तिसर्‍या मजल्यावर गेलो. ह्या मजल्यावर पुस्तके व वाचनासाठी जागा फार कल्पकतेने तयार केली आहे. स्टेप बाय स्टेप अशी जागा आहे. शिवाय बसण्यासाठीच्या खुर्च्या व मेज (टेबल) च्या डिझाईन पण फार वेगळ्या आणि छान आहेत.

ह्या लायब्ररी ची एंट्री फ्री ऑफ कॉस्ट आहे. इथे बरेच विद्यार्थी एकमेकांना भेटून चर्चा करून अभ्यास करताना दिसले. आम्ही पण इथे जरा वेळ बसुन ते वातावरण अनुभवले. छान वाटलं. मग तिथून निघायच्या आधी फ्रेश होऊन (इथे पुरुष व स्त्रियांना एकच फ्रेश रूम आहे) निघालो.

वाचनालयातून निघालो तेव्हा 1 वाजला. त्यामुळे मग जेवायला जायचे ठरवले. चिराग बरोबर KTH मध्ये शिकणारी त्याची एक युक्रेनियन मैत्रिण स्वीटलाना आम्हाला जेवणाच्या वेळी Esplanadi पार्क जवळील कॅफे Esplanadi मध्ये भेटायला येणार होती. तिने डाटा technology मध्ये पोस्ट graduation केलय आणि Helsinki मध्ये एका कंपनी मध्ये जॉब करते. त्यामुळे लंच टाईम मध्ये भेटायचे ठरले.

आम्ही 1.15 लाच कॅफे मध्ये पोहोचलो. स्वीटलाना ला यायला वेळ लागणार होता म्हणुन आम्ही आमची ऑर्डर घेऊन खायला चालू केले. डिश पण स्वीटलाना ला विचारूनच ऑर्डर केली. तिने सजेशन दिले, त्या प्रमाणे creamy salmon soup (हा एक प्रसिद्ध फिनिश पदार्थ आहे) घेतले. ह्यात salmon फिश बरोबर उकडलेला बटाटा, ब्रोकोली इत्यादी उपलब्ध भाज्या होत्या. आणि वर dill leaves (शेपू ची पाने 😂) topping/ भुरभुरलेली होती. ते बघून प्रशांत आणि ईश्वरी च्या चेहर्‍यावरचे भाव टिपून मी आणि चिराग खूप हसलो.

आम्ही खात असतानाच स्वीटलाना आम्हाला जॉईन झाली. तिने आधीच ऑर्डर सांगून ठेवल्याने तिला पटकन मिळाले.

आमच्या मस्त हसत गप्पा चालू होत्या. ती मला सांगत होती की ती ऑक्टोबर का नोव्हेंबर मध्ये दिल्ली आणि कोलकता ला मैत्रिणी च्या लग्नासाठी येणार आहे. तिला इंडियन कल्चरचे लग्न बघायचे आहे. ती हे पण म्हणाली की Helsinki मध्ये सोशल लाईफ असे जास्त नाही कारण फिनिश लोक फार म्हणजे फारच reserve आहेत. ती माणसांबरोबर बोलायला तरसते. त्यामुळे चिराग ने कुटुंबा बरोबर Helsinki मध्ये आहे, भेटायला जमेल का? असे विचारल्यावर मी लगेच हो म्हणाले, हे तिनी प्रांजळपणे सांगितले. गम्मत म्हणजे आमच्या पहिल्या भेटीतच एवढ्या छान गप्पा चालू आहेत बघून आजूबाजूच्या टेबल वरचे फिनिश लोक आमच्या कडे फारच कौतुकाने बघत होते 😆 तिथे बाहेर एक ग्रुप फोटो काढून ती ऑफिस ला परत निघाली.

आदल्या दिवशी सोमवारी Uspenski Cathedral चर्च बंद होते म्हणून प्रशांत आणि चिराग ते आतून बघण्यासाठी गेले. मी आणि ईश्वरी तोपर्यंत कॅफे व पार्क जवळील एका बेंचवर बसून गप्पा मारत बसलो. ईथे आजूबाजूला भरपूर लोक असल्याने सुरक्षित वाटत होते. शिवाय आजूबाजूला असणारी शोभेची रोपे ट्रीम करण्यार्या मुली पण होत्या. त्यांच्या बरोबर थोडे बोलण्यात पण वेळ गेला. प्रशांत, चिराग एक तासात चर्च बघून आले. मग आम्ही Helsinki Central वर जाऊन लॉकर मध्ये ठेवलेले सामान घेऊन Helsinki पोर्ट वर गेलो. तोपर्यंत 4 वाजले होते. आमचे स्टॉकहोम च क्रुज 5 वाजता तिथून निघणार होते. दुसर्‍या दिवशी 21 जून ला (इंटरनॅशनल योगा दिवस च्या दिवशी) सकाळी 10 वाजता आम्ही परत स्टॉकहोम मध्ये पोहोचणार होतो.

परतताना देखील मुलांनी क्रुज मस्त एन्जॉय केली. भारतीय दूतावास नी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात तो सकाळी लवकर असल्याने सहभागी व्हायला जमलं नाही. मात्र परत आल्यावर काय केल हे जाणून घेण्यासाठी आपण पुढील भागात लवकरच भेटू यात 😊
ता. क. : हेलसिंकी शहरात 1952 साली झालेल्या ऑलिंपिक खेळात आपले भारतीय कुस्तीपटू खाशाबा जाधव ह्यानी पहिले वैयक्तिक कांस्यपदक भारतासाठी मिळवले होते.

— लेखन : सुप्रिया सगरे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments