माझ्या आमराईत कोकिळा येते
मित्रहो ती माझ्यासाठी गीत गाते
आंब्याचे झाड माझे डवरलेले
नव सोनेरी मोहराने सजलेले
काल्या रंगाची पक्षीण परी येते
मित्रहो ती माझ्यासाठी गीत गाते
आंब्याच्या तरूतळी गार सावली
सावलीत माझी स्वारी बसलेली
लाल डोळ्यांची स्वरलता येते
मित्रहो ती माझ्यासाठी गीत गाते
झाडावरती फळांचे घड लागलेले
वा-यात झुलती, झुंबर टांगलेले
आंबे सोडून बया मलाच पहाते
मित्रहो ती माझ्यासाठी गीत गाते
कोकिळेमुळेच नभ उतरू झाले
घन मेघांचे संमेलनच हो भरले
पावसात भिजण्याचे आले भरते
मित्रहो ती माझ्यासाठी गीत गाते.
— रचना : गज आनन म्हात्रे. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
