“आम्ही अधिकारी झालो” या श्री देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या – संपादित केलेल्या आणि न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली आहे. तर दुसरी आवृत्ती प्रकाशनाच्या वाटेवर आहे. या पुस्तकाविषयी प्राप्त झालेले निवडक अभिप्राय पुढे देत आहे.
या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
– संपादक
१. मा. देवेंद्रजी भुजबळ सर, सर्वप्रथम तुमच्या “आम्ही अधिकारी झालो” या साहित्य कृतीसाठी मनःपुर्वक अभिनंदन.
काट्याकुट्यांच्या पायवाटेतून ध्येयप्राप्तीच्या दिशेनं मार्गक्रमण करताना ‘आत्मविश्वास’ हा अत्यंत महत्वाचा असतो. हा प्रवास व्यक्तिपरत्वे बदलतो. अशा जिद्दी, चिकाटी वृत्तीच्या हिरे-माणिकांना तुम्ही ‘आम्ही अधिकारी झालो’ या गुंफमाळेत कौशल्यपूर्ण पद्धतीने गुंफले आहे. त्यांचा हा प्रवास आम्हा वाचकांसाठी तितकाच प्रेरणादायी ठरेल, अशी आशा आहे.
स्वबळावरती उभी केलेली इमारत कोसळून पडण्याची भिती कधीच नसते. स्वअस्तित्व स्वतःच्या मेहनतीनं निर्माण करणं, ह्यात खरा ‘सन्मान’ दडलेला आहे. सदर साहित्यकृती वाचनीय आहे यात शंकाच नाही. आम्हाला सातासमुद्रापारही ती वाचण्याची संधी मिळाली. धन्यवाद.
— प्रियांका शिंदे जगताप, कॅनडा.
२. आम्ही अधिकारी झालो..
हे खूप मोठं काम आहे सर तुमचं आणि अलकाताईंच.
प्रतिकूल परिस्थितीत असणाऱ्या विद्यार्थांना खूप प्रेरणा मिळणार आहे यातून लक्षात येतं की यासाठी किती परिश्रम घेतले आहेत आपण दोघांनी ते. आ.देवेंद्र सर, आ. अलकाताई मनःपूर्वक अभिनंदन, शुभेच्छा आणि तुमच्या धडपडीला सलाम !
— स्नेहलता झरकर -अंदुरे (धाराशिव)
३. सन्मा अलकाताई भुजबळ मॅडम तथा श्री भुजबळ साहेब,
आपल्या सकस लेखणीतून सर्वंकषपणे लिहिलेल्या, “आम्ही अधिकारी झालो – एक दृष्टिक्षेप” समाजातील विविध स्तरातील व आपल्या कुटुंबाच्या अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करत जी मुले – मुली विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून “यशवंत होऊन अजिंक्यवीर” झाले अशा विविध क्षेत्रातील ३५ जिगरबाज अधिका-यांच्या यशोगाथांचा लेखाजोखा आपल्या “आम्ही अधिकारी झालो” या मौलिक पुस्तकातून त्यांच्या संघर्षमय प्रवासाचा प्रेरणादायी आढावा घेतला आहे.
सदर पुस्तक येणाऱ्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी व दीपस्तंभ ठरेल असा विश्वास वाटतो. आपल्या चौकस विचाराला आणि सामाजिक बांधिलकीला साष्टांग दंडवत !!
आपले मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!
आपला स्नेहांकित,
— राजाराम जाधव (निवृत्त सह सचिव) नवी मुंबई.
४. “स्वप्नं पाहणे आणि त्यांच्या परिपूर्तीसाठी अखंड पाठपुरावा करत राहणे यापासून माणसाला कोणीही रोखू शकत नाही !” हा संदेश बोलक्या उदाहरणांनी घालून देणारे ‘आम्ही अधिकारी झालो’ हे पुस्तक सर्वांना सदैव प्रेरणा देत राहील…
देवेंद्र भुजबळ, अलका भुजबळ यांचे अभिनंदन आणि लेखक/प्रकाशक म्हणून त्यांना खूप खूप शुभेच्छा !
— प्रल्हाद जाधव. लेखक, नाटककार,
निवृत्त माहिती संचालक, मुंबई
५. अरे व्वा ! सातासमुद्रापार म्हणजे जपान बुलेट ट्रेन मध्ये देखणा प्रकाशन सोहळा झालेला दिसतो आहे. “आम्ही अधिकारी झालो” हे पुस्तक केवळ मार्गदर्शक नसून करिअर लाईफ लाईन आहे.
या प्रकाशनपूर्व संपलेल्या आवृत्तीचा मी स्वतः पुस्तक घेऊन साक्षीदार झालो हा माझा अभिमान आहे.
भुजबळ साहेब व सौ.अलकाताईंचे अभिनंदन व शुभेच्छा !
— बालकवी गोविंद पाटील जळगाव.
६. अतिशय उत्तम माहिती देणारे आणि नव तरुण तरुणींना अभ्यासास उपयुक्त, मार्गदर्शक पुस्तक लेखक व संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या “आम्ही अधिकारी झालो” या पुस्तकाबद्दल मनापासून अभिनंदन.
हे सर्वांग सुंदर, आकर्षक पुस्तक सौ.अलकाताई भुजबळ यांनी प्रकाशित केले त्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि पुस्तकातील सर्व व्यक्तीरेखांना त्यांच्या उज्ज्वल सुयशाबद्दलही मन:पूर्वक कृतज्ञतेचा नमस्कार ! सलाम !!..
— सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक, महाराष्ट्र शासन, नासिक.
७. नमस्कार, काका.
आज माझा मुलगा सुपर्ण याने “आम्ही अधिकारी झालो” हे पुस्तक वाचले असताना, त्याच्या मनात प्रश्न पडला की हे पुस्तक गुगल वर आहे का ? आम्ही लगेच सर्च केले असता, आलेला रिझल्ट पाहून तो खुप खुष झाला व तुमचा आम्हाला खुप अभिमान वाटला. त्याला पुस्तकातील अधिकारी सुध्दा सर्च करुन दाखवले. ते सर्व गुगल वर आहेत, हे पाहून तो अजून आवडीने पुस्तक वाचतोय.
Thank you kaka,
— गौरव रासने. संगमनेर
८. नमस्कार “आम्ही अधिकारी झालो” हे आपले पुस्तक वाचले. हे पुस्तक माहितीपूर्ण, तरुणांना मार्गदर्शनात्मक, प्रोत्साहन देणारे उपयुक्त असे आहे.
ज्या मोजक्या वरीष्ठ शासकीय अधिकाऱ्यांमध्ये लेखनशैली आहे अशा मोजक्या मान्यवरात आपलं नाव घ्यावच लागेल.
या निमित्ताने आपले मनापासून हार्दिक अभिनंदन व शूभेच्छासह आपल्या समस्त परिवारास निरोगी निरामय असे आयुष्य लाभो हीच साहित्य शारदादेवी जवळ मनापासून प्रार्थना.
— नंदकुमार रोपळेकर. ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.
९. नमस्कार,
“आम्ही अधिकारी झालो” वाचून खूप छान वाटले. तरुण पिढीसाठी अतिशय उपयुक्त संकलन. भावी आवृत्तीसाठी शुभ कामना.
— दिलीप चावरे. ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.
११. हार्दिक अभिनंदन भुजबळ
सर आणि अलका मॅडम. “आम्ही अधिकारी झालो” हे पुस्तक वाचले. ह्या पुस्तकाची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढत राहावी आणि अशा अनेक पुस्तकांचे आपल्या हातून लेखन व प्रकाशन होत राहावे, हीच मनःपूर्वक शुभेच्छा.
— सौ मृदुला राजे. जमशेदपूर.
१२. पुस्तक वाचून झालं. खूपच मस्त.
खूपच प्रेरणादायक. नेमक्या शब्दात, कुठेही पाल्हाळ न लावता, त्यांचा ध्येया पर्यंतचा खडतर मार्ग आणि त्यावरचा प्रवास मांडण्यात, दाखवण्यात लेखक 100% यशस्वी झालेत. खूप मार्गदर्शक ठरणार हे पुस्तक. किती संघर्ष करत पोचले सगळे ! आणि अगदी down to earth. great great.
खूप खूप अभिनंदन.
तुमच्या मेहनतीला सलाम.
— नीता देशपांडे. पुणे
— संकलन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800