जागतिक महिला दिनानिमित्त “आम्ही सिद्ध लेखिका” डोंबिवली शाखा आयोजित आनंदोत्सव नुकताच उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला.
सर्वप्रथम संस्था अध्यक्ष मा. पद्मा हुशिंग, डोंबिवली शाखा प्रमुख अनुराधा फाटक, सचिव वृषाली राजे, विश्वस्त विजया पंडितराव यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन आणि नर्तिका अपर्णा पेंडसे यांच्या शास्त्रीय देवी वंदनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दोन सत्रात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
प्रथम सत्रात “छापा काटा” ही स्पर्धा संपन्न झाली.
छापा काटा या वादविवाद स्पर्धेत वर्तमान परिस्थितीतील अनेक कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक विषयावर वादविवाद स्पर्धा झाली. अतिशय अभ्यासपूर्ण झालेल्या या स्पर्धेत तीन गटांना विजयी घोषित करण्यात आले.
परीक्षक म्हणून प्रा.ललिता नाम जोशी, शितल दिवेकर, अंजली खिस्ती, विदुषी धनश्री साने आणि प्रा.मेधाताई सोमण यांनी काम केले.
दुस-या सत्रात मराठी महिन्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यात सिद्ध लेखिकांचे 15 गट सहभागी झाले होते.
मराठी बारा महिन्याच्या नावानुसार चैत्र ते फाल्गुन या महिन्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
मनोरंजनातून बोध देणा-या या कार्यक्रमात संस्थेच्या ३० लेखिका सहभागी झाल्या होत्या.प्रा. मेधा सोमण यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला व विशेष मार्गदर्शन केले.
पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन
–शुभदा कुलकर्णी आणि आदिती जोशी यांनी केले तर दुसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन वैशाली जोशी यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे अतिशय सुबक, नीट नेटके आयोजन आणि नियोजन डोंबिवली च्या सख्यांनी केले होते.
प्राची गडकरी यांनी विशेष मार्गदर्शन केले. प्रतिभा दाबके यांनी आभार मानले.
शेवटी बक्षीस समारंभ आणि पसायदानाने या आनंदोत्सव साहित्य संमेलनाची सांगता झाली.
— लेखन : डॉ.अंजुषा पाटील. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800