Wednesday, February 5, 2025
Homeलेखआयुर्वेद उवाच ( ३ )

आयुर्वेद उवाच ( ३ )

मागच्या लेखात आपण तीळ गुळाचे महत्व पाहिले. आजच्या भागात दूधा विषयीची माहिती जाणून घेऊ या.

दूध (क्षीर) आयुर्वेदात ८ प्राण्यांच्या दुधाचे वर्णन केले आहे. नित्य उपयोगी अशा गाय, बकरी आणि म्हशीच्या दुधाच्या गुणांचे वर्णन आपण आजच्या लेखात बघणार आहोत.

प्रवरं जीवनियनां क्षीरं उक्तं रसायनं।

आयुर्वेदात दुधाला क्षीर असे म्हटले आहे. ते जीवनिय म्हणजे जीवन देणारे आणि रसायन म्हणजे सर्व शरीराला पोषण करणारे असते. बाल, वृद्धांना सात्म्य म्हणजेच पिण्यास योग्य आहे.

*अजा दुग्ध (बकरी चे दूध) –
गव्यतुल्यगुण त्वम् अजं विशेषात शोषिणा हितम।।

सुश्रुतांनी गायीच्या दुधाप्रमाणे ह्यास स्थान दिले आहे.
हे दूध शोषहर म्हणजे राजयक्षमा (सध्याच्या काळात टी बी) ह्यात उपयुक्त ठरते. पूर्वीच्या आचार्यांना शेळी मध्ये टीबी ची प्रतिकार शक्ती होती हे माहीत होते. हे दूध पचायला हलके असल्यामुळे सर्व व्याधी नाशक आहे. तसेच पचायला हलके असल्याने ज्या नवजात बालकांना मातेचे दूध मिळत नाही अशांना शेळीचे दूध पूर्वी दिले जात असे.

म्हशीचे दूध हे पचायला अत्यंत जड आणि निद्रा जनन म्हणजे झोप आणणारे आहे. म्हणूनच अति श्रम करणारे व्यक्ती किव्वा अनिद्रेने पीडित व्यक्ती आहारात ह्याचे सेवन करू शकतो. परंतु आपल्या पाचन शक्तीचा विचार करून.

* कोणतेही कच्चे दूध हे पचायला जड असते व उकळल्यावर ते त्या प्रमाणात पचण्यास हलके होते.
धारोष्ण दूध हे सर्व गुण युक्त असते.
– बऱ्याच लोकांना दुध पचत नाही त्यांना lactose intolerance असतो अशा लोकांना दुध प्यायचे असल्यास ते क्षीरपाक पद्धतीचा उपयोग करून बघू शकतात
१ पाणी+१/४ चमचा सुंठ+ खडीसाखर प्रथम एक उकळी आणावी आणि मग १ कप दुध घालून उरलेले पाणी संपूर्ण आटवावे असे दुध पचायला हलके असते आणि त्यामुळे अशा व्यक्तींना त्रास कमी होऊ शकतो.

– आयुर्वेदामध्ये विरुद्ध अन्न प्रकारात रसविरुद्ध प्रकार येतो त्यात मधुर आणि आम्ल रस एकत्र करू नये असे आयुर्वेद सांगते. दुध मधुर रसाचे आहे आणि बहुतांशी फळे ही थोडीशी आम्ल म्हणजे आंबट रसाची असतात. म्हणूनच फळ व दुध एकत्र करणे हे विरुद्धांन्न आहे.
म्हणजे fruit salad with milk , fruit milk shake अशा प्रकारचे कॉम्बिनेशन हे आयुर्वेदात अयोग्य unhealthy समजले जातात कारण ह्या सर्वांचा परिणाम शरीरावर वाईट होतो.
दूध हे पौष्टिकच आहे फक्त योग्य पद्धतीने त्याचे सेवन करणे आवश्यक आहे.
भेटूया पुढील लेखात तोपर्यंत………
आयुष्य जगा आयुर्वेदा संगे।

डॉ शार्दुल चव्हाण

– लेखन : प्रा वैद्य शार्दूल चव्हाण
एम. डी.आयुर्वेद. मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी