देशासाठी शीर तळहातावर घेऊन लढणारे सैनिक सुध्दा किती संवेदनशील मनाचे असतात, याची प्रचिती देणारी सैनिक श्री रामदास अण्णा यांची कविता पुढे देत आहे…
का आणि कशासाठी।
तू रोज पळत सुटला।
आनंदाचा क्षण वेड्या।
किती तुला भेटला ।l
आयुष्यभर धावतोय।
ध्येय गाठण्यासाठी।
एकदा प्रयत्न कर तू।
समाधानासाठी।।
जीवन प्रवास आहे।
अपेक्षा फक्त मार्गात।
समाधान होत नाही।
जरी गेलो स्वर्गात।।
आयुष्याचा प्रवास हा।
असाच सुरू असणार।
आज येथे असणार।
किंवा उद्या नसणार।।
म्हणून जन्म मृत्यूचा।
कच्चा आहे धागा।
सोडून सगळी चिंता।
आज आनंदात जगा।।

– रचना : रामदास आण्णा