Wednesday, December 3, 2025
Homeसाहित्यआयेचा प्रतिबिंब

आयेचा प्रतिबिंब

मायेचा साजूक तूप,
आयेचा दुसरा रूप ॥
काळजेन दीता धाक,
ममतेन मारता हाक ॥

कदी होता ढाल,
कदी उबदार शाल ॥
संकटात आधाराचो सेतू,
मनात नसता हेतू ॥

हट्टान गाल फुगवतस,
रागान कान पिळवटतस ॥
पदरान आसवा टिपतस,
मायेन हात फिरवतस ॥

आयेच्या गर्भात वाढलव,
बालपणी अंगणात खेळलव ॥
परक्याचा धन झालस,
आठवणी ठेवन गेलस ॥

ओढीन वाट बघतस,
वरसान एकदा भेटतस ॥
हक्कान भाऊबीज मागतस,
डोळ्यात प्रतिबिंब दिसतस ॥

जगावेगळी वेडी माया,
चिरंतन बहिणीची साया ॥
अतूट नात्याचो धागो,
आयेनंतर ताई जगो ॥

वर्षा भाबल.

– रचना : सौ. वर्षा महेंद्र भाबल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ.मृदुला राजे on धुक्याची चादर
सौ.मृदुला राजे on बहिणाबाईं…
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on प्रतिभावान प्रतिभा
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on सानपाडा : अनुकरणीय आनंद मेळावा
चंद्रकांत Chandrakant बर्वे Barve on चित्र सफर : 58
Vilas kulkarni on खळी पडू दे !
गोविंद पाटील सर on प्रतिभावान प्रतिभा
स्नेहा मुसरीफ on स्नेहाची रेसिपी : ३७