महाराष्ट्र शासनाने आय ए एस अधिकाऱ्यांच्या आज रोजी (२०.८.२०२१) पुढीलप्रमाणे बदल्या केल्या आहेत.
१) डॉ महेंद्र कल्याणकर यांची नियुक्ती जिल्हाधिकारी, रायगड या पदावर करण्यात आली आहे.
२) डॉ निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड यांची नियुक्ती संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.
३) श्री संजय मीना, अतिरिक्त आदिवासी आयुक्त यांची नियुक्ती जिल्हाधिकारी, गडचिरोली या पदावर करण्यात आली आहे.
४) श्री एम बी वारभुवन, सहसचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय यांची नियुक्ती, अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे या पदावर करण्यात आली आहे.
५) श्री दीपक सिंगला, जिल्हाधिकारी, गडचिरोली यांची नियुक्ती सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर या पदावर करण्यात आली आहे.
६) श्री अजित कुंभार, (अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवड यादी) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांची नियुक्ती सह आयुक्त,
मुंबई महानगरपालिका या पदावर करण्यात आली आहे.
७) श्री अजित पवार, (अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवड यादी) अध्यक्ष, जिल्हा जातपडताळणी समिती, पुणे यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड या पदावर करण्यात आली आहे.
८) श्री संजय दैने, (अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवड यादी) अध्यक्ष, जिल्हा जातपडताळणी समिती, गोंदिया यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली या पदावर करण्यात आली आहे.
– टीम एनएसटी 9869484800.