निळासावळा श्रीरंग,
कालिंदी वाहे काळी
वृंदावनात रास रंगतो
टिपरी आणिक टाळी
प्रत्येकीला भास हाच की
तिचाच कृष्ण मुरारी
खट्याळ कान्हा अशी खेळतो
गोपिकांशी खेळी
नको नको ती जादू करतो
कान्हा वेळी अवेळी
अन पाण्याला निघते राधा
तिन्हीसांजेच्या वेळी
निळ्या नभातून बरसती
जणू गुलाबाच्या ओळी
राधिकेचे अंतर्मन अन
भिजते साडी चोळी
तरंगते ती वाऱ्यावर
कान्हाने भरता झोळी
तोच सुगंधी वारा पिते
वेणु कातरवेळी
राधेच्या गालाची लाली
मोरपिसात मिळाली
आरक्त निळाई म्हणून सजते
नभात पहाटवेळी

– रचना : डॉ. स्वाती घाटे. राजस्थान
वाह सुरेख झालीय 👌👌
अंजली मराठे
अप्रतिम कविता डॉक्टर