सहा ऋतुंचे सोहळे
वर्षा ही ऋतुंची राणी
आला आला पावसाळा
सर गाई गोड गाणी
सौदामिनी बॅंड वाजे
बेडकाला येई मजा
प्रतिबिंब पाहण्यास
मीन काढी छोटी रजा
धरित्रीला आभुषण
हिरवळी साज हवा
दरवर्षी महावस्त्र
घनःश्यामा घ्यावा नवा
काळे ढग गर्भवती
वर्षा ऋतू प्रसवती
धरामाई आनंदाने
सांगे मी सौभाग्यवती
मृदू गरा ओलाव्यात
कृषकाला तो सुकाळ
धन धान्य बहुपुत्र
लाभं मिटवी दुष्काळ
तरुवर तारुण्यात
येती अतिथी पाखरे
बांधी घरटे फांदीत
सुखावती ही लेकरे
फळं फुलांच्या आस्वादा
अन्य वन्य खग येती
मिष्टान्नाच्या सेवनाने
वंश दीप घडवेती
— रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
शोभा कोठावदे यांची पावसाचं यथार्थ वर्णन करणारी कविता आहे. पावसाच्या सरींचा शब्द सरींमध्ये छान गुंफण केलेलं उत्तम काव्य आहे. अभिनंदन, शुभेच्छा आणि शुभचिंतन.राम खाकाळ, माजी निर्माता दिग्दर्शक मुंबई दूरदर्शन आणि संकल्पक मिशन एक गाव एक परिवार तसेच संकल्पक मिशन विषमुक्त अन्नासाठी विषमुक्त शेती.
सुंदर शब्दांकन