सावधान……
यंदा उन्हाळा कडक आहे.
तापमान नेहमी पेक्षा 5 अंशांनी जास्त राहील.
ही माहिती सर्वांच्या फोन मध्ये टाका.
3 गोष्टी जाणा.
1. उन्हाचा त्रास असा टाळा :
तहान लागणार नाही एवढे पाणी सतत पित रहा.
कपडे कमीत कमी पण सभ्य घाला. जाळी दार हवेशीर होजियरी पांढरे सर्वोत्तम.
टोप्या, रुमाल वापरा.
नवशिशुंना उन्हाचा सर्वाधिक त्रास होतो.
ते पिवळे दिसतात.
त्यांना उघडे ठेवा.
सारखे आईचे दूध पाजा.
2. ताप आला तर …
खालील पैकी एक पण लक्षण दिसले तर हा
उन्हाचा ताप आहे.
1) आजाराच्या तापात तळहात तळपाय गार असतात. उन्हाच्या तापात ते गरम असतात.
2) दोन बोटात गाल धरा. एक तोंडाच्या आत. एक चामडीवर. तोंडाच्या आतल्या बोटपेक्षा बाहेरच्या चामडीच्या बोटाला जास्त गर्मी लागली तर ताप उन्हाचा आहे.
3) गळ्याला हात लावा. घामाने आपला गळा ओलसर लागतो. उन्हाचा ताप असेल तर घाम नसतो. गळ्याची चामडी कोरडी लागते.
4) तहान लागते.
5) लघवी कमी होते. पिवळी होते. तिला वास येतो.
6. इतर काही त्रास नाही.
3. उपाय :
वारंवार डोक्यावरून आंघोळ करा.
गार खोलीत जा.
कुलर, एसी पंखा लावा.
तहान लागणार नाही व लघवी खूप होईल एवढे पाणी प्या. द्रव पदार्थ प्या.
काही होऊन उपचार घेण्यापेक्षा काही होणारच नाही, याची दक्षता घेतलेली बरी. नाही का ?

– लेखन : डॉ हेमंत जोशी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800