Wednesday, December 3, 2025
Homeलेखआला उन्हाळा, तब्येत सांभाळा

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा

माननीय डॉ अप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल
केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांच्या हस्ते, मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इतर अनेक मान्यवर आणि अप्पासाहेबांचे लाखो अनुयायांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध, नियोजनपूर्वक पार पडला. पण दुर्दैवाने उष्माघाताने काही अनुयायांचे निधन झाले. काही अजून रुग्णालयात आहेत. ज्यांचे निधन झाले, त्यांना विनम्र अभिवादन. तसेच आजारी असलेले लवकर बरे होण्याची आपण कामना करू या.

खरं म्हणजे मुंबई आणि परिसरात यंदा जाणवतो, इतका उन्हाळा यापूर्वी कधीही जाणवला नव्हता. ही बाब लक्षात घेऊन आपण ५ एप्रिल रोजीच मी (डॉ हेमंत जोशी) आपल्या पोर्टल वर “आला उन्हाळा, तब्येत सांभाळा” हा यथोचित सल्ले देणारा लेख प्रसिद्ध केला होता.
त्या लेखातील मौल्यवान मजकूर आज पुन्हा पुढे देत आहे.

सावधान !
यंदा उन्हाळा कडक आहे.
तापमान नेहमी पेक्षा 5 अंशांनी जास्त राहील.

या कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी आपण पुढील
3 गोष्टींचा अवलंब करा.

1. उन्हाचा त्रास असा टाळा.
तहान लागणार नाही एवढे पाणी सतत पित रहा.
कपडे असे घाला,
सभ्य पण कमीत कमी.
एकच थर. ढिले.
जाळी दार हवेशीर होजियरी पांढरे सर्वोत्तम.
टोप्या, रुमाल वापरा.

नवशिशुंना सर्वाधिक त्रास होतो.
ते पिवळे दिसतात.
त्यांना उघडे ठेवा.
सारखे आईचे दूध पाजा.

2. ताप आला तर…
खालील पैकी एक जरी लक्षण असेल तर हा
उन्हाचा ताप आहे, असे समजावे.

🔹 नेहमीच्या तापात तळहात, तळपाय गार असतात. उन्हाच्या तापात ते गरम असतात.
🔹 दोन बोटात गाल धरा. एक तोंडाच्या आत,
एक चामडीवर.
तोंडाच्या आतल्या बोटापेक्षा बाहेरच्या चामडीच्या बोटाला जास्त गर्मी लागली तर ताप उन्हाचा आहे.
🔹गळ्याला हात लावा. घामाने आपला गळा ओलसर लागतो.उन्हाचा ताप असेल तर घाम नसतो. गळ्याची चामडी कोरडी लागते.
🔹तहान लागते.
🔹लघवी कमी होते. ती पिवळी असते. तिला वास येतो.
🔹इतर काही त्रास नाही.

3. उपाय : वारंवार डोक्यावरून आंघोळ करा.
कुलर, एसी पंखा लावा.
गार खोलीत जा.
तहान लागणार नाही व लघवी खूप होईल एवढे पाणी प्या. द्रव पदार्थ सतत प्या.

कृपया आपण सर्वांनी हा मजकूर केवळ वाचावाच असे नाही तर त्याचे शब्दशः पालन करावे आणि आपली, आपल्या कुटुंबीयांची तब्येत सांभाळावी.
आपल्याला सुरक्षित उन्हाळ्यासाठी शुभेच्छा.

डॉ हेमंत जोशी

– लेखन : डॉ हेमंत जोशी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments