वर्षत हर्षा आली दिवाळी
संगे घेऊन प्रकाशावली
इंद्रधनुची प्रभा फाकली
रंगावली होऊन ही सजली
आली दिवाळी आली दिवाळी
आनंदाने मने नाचली
नवीन कपडे नवी खरेदी
नव युगुलाची नवी नवलाई
नव चैतन्ये धरा हासली
नवरंगाची लज्जत न्यारी
आली दिवाळी आली दिवाळी
शुभसंदेशांची रीघ लागली
ज्योती ज्योती तेजाने न्हाली
तिमिराला त्या भेदीत आली
मिणमिणत्या पणत्यांच्या ठायी
चांदण्याच जणुं आल्या भूतली
आली दिवाळी आली दिवाळी
आकाशदीपांनी गर्दी केली
मिष्टांन्नांची चंगळ झाली
रात चंद्रज्योतींनी फुलली
संदेश देतसे ही दीपावली
दीप उजळवा दारोदारी
आली दिवाळी आली दिवाळी
दुःख दैन्य तिमिरास उजळवी
पर्णकुटींचे भान ठेवूनि
तिथे उजळवूं पणती ज्योती
हासत खेळत सारे जमुनि
दीपोत्सव हा साजरा करी
आली दिवाळी आली दिवाळी
द्वेष अहंभावा दूर सारी

– रचना : स्वाती दामले
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
Swatitai ni Diwali kavita sunder shabdani ragvali ahe.surekh
खुप सुंदर रचना.दिवाळी सुंदर कविता
स्वाती दामले ह्यांची आली दिवाळी कविता आवडली . साजेसे शब्दांनी ती खरंच रंगावली झाली आहे.
..