दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, प्रकाशाचा महोत्सव !!!! खरं म्हणजे, प्रभु रामाच्या स्वागतासाठी अयोध्यावासींयांनी केलेला दिपोत्सव !!!
प्रभुराम यांनी रावणाचा वध केला तो दिवस विजयादशमी म्हणजे दसरा. त्यादिवशी श्रीराम अयोध्येला यायला निघाले. त्या दिवसापासून 20 दिवसांनी श्रीराम अयोध्याला पोहोचले.
श्रीरामांच्या स्वागतासाठी जनतेने दिपोत्सव करून पताका फडकवीत दारात सुरेख, सुंदर रांगोळ्या रेखल्या. प्रभुरामांचं स्वागत केलं तीच आपली दिवाळी.
कोरोनाच्या भयंकर संकटामुळे गेल्या २ वर्षात दिवाळीच काय कोणतेच सण साजरे झाले नाही. उलट कितीतरी जवळ च्या व्यक्तींचं निधन होऊन कायमचं दुःख उराशी आलं.
एकाध वाईट स्वप्न पडावं आणि होत्याचं नव्हतं झालं. आईचं, पत्नीचं, बहिणीचं, वडिलांचं, पतीचं, भावाचं, मित्राचं आणि देशाचं, असं सर्वांचे स्वप्न धुळीत गेले.
यंदाची दिवाळी आनंदाने साजरी होईल अस हरेक भारतीयाचं स्वप्न साकार करण्यासाठी लवकरच प्रभुराम अयोध्येला येत आहेत. दुष्ट प्रव्रुत्ती व रोगराई नष्ट होत आहेत. भारतवासी त्याच प्रतिक्षेत आहे.
मनं आनंदाने गुणगुणत आहे….
येणार आता रघुनाथ
जनता थकली पाहून वाट
आतुरला जीव कधी रे येणार
रघुनाथ अंथरली बघ ही सुगंधी फुलांची रास
येणार रघुनाथ थकले नेत्र पाहून वाट
दिवाळीचा आनंद सर्वाना मनसोक्त मिळावा अशी प्रभुरामाच्या चरणी प्रार्थना करूया.
आनंदी आनंद चोहीकडे दिसूं दे
भारताच्या या स्वातंत्र्य अम्रुतमहोत्सवात सर्व जनता सुखी समाधानी होऊ दे.
दिवाळीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा..!!!

– लेखन : सुरेखा तिवाटणे
– संपादन : अलका भुजबळ 9869484800