रविवार, ११ जुलै पासून आषाढ मास सुरू होत आहे. हा दिवस महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने कालिदासाचे हे स्मरण.
आषाढास्य प्रथम दिवसे, अशी सुरुवातच महाकवी कालिदास लिखित “मेघदूत” ह्या काव्याची. भारतीय मनाला नेहमीच भुरळ घालणारं हे काव्य.
महाकवी कालिदास यांचे मेघदूत हे संस्कृत साहित्यातील एक अलौकिक कलाकृती आहे. मंदाक्रांता सारखे वृत्, वेधक स्थळचित्र आणि पार्श्वभूमीवर व्यक्त झालेल्या उत्कट प्रणय भाव आणि हे सारे समर्थपणे शब्दांकित करणारे कालिदासाची शैली …….
प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीने, सरळ निवेदन पद्धतीने, मूळ काव्याचा रस व आशय वाचका पर्यंत पोहचवला आहे.
|| कुबेर सेवक यक्ष एक कुणी सेवे माझी आपल्या चुकला प्रिया वियोगे अधिकच दुस:ह वर्षाचा त्या शाप मिळाला जनक सुतेच्या स्नाना योगे पावन झाले जिथे जलाशय घनच्छाय त्या रामगिरीवर विविध आश्रमी घेई आश्रय ||
एका यक्षाला त्याच्या कर्तव्यचुकीमुळे यक्षराज कुबेर, एक वर्षाच्या हद्दपारीचा शाप (शिक्षा) देतो. ते पण अलका नगरी पासून लांब अशा रामगिरी पर्वतावर राहण्याची.
विरहात तळमळणारा हा यक्ष आकाशातल्या मेघाला पाहतो आणि दूत बनवून आपल्या पत्नीला निरोप पाठवतो.
रामगिरी पासून ते अलकानगरी पर्यंत जाताना लागणारे, अवंती देश, विदिशा नगरी, ब्रह्मवर्त, कुरुक्षेत्र, गंगोत्री, दिमधवल पर्वत, त्यातील लागणारी नगरे आणि निसर्ग ह्याचे वर्णन तो मेघाला विस्तृत पणे सांगतो.ही झाली मेघदूतातली काव्यकल्पना.
कालिदासाच्या प्रतिभा संपन्नतेला प्रणाम 🙏 आणि शांता बाईच्या अनुवादाला सुद्धा प्रणाम.
“पादा कुलाक” वृतांत अतिशय प्रवाहिपणे आपल्या डोळ्यासमोर चित्र कृती उभी राहते.
माझा विचार :
ढगातून निरोप देण्यावरून—–
आज कालची पिढी म्हणे, आपले पर्सनल संदेश, डेटा, cloud मध्ये सेव्ह करतात. हे पण प्रतिभावंत कालिदासाच्या प्रतिभेचं आधुनिक सत्य रूप समजायचं का ?? असंख्य प्रश्न ??

– लेखन : ममता मुनगीलवार
– संपादन : अलका भुजबळ 9869484800.
Khupach chan lihilis