लेखिका सुरेखा गावंडे, अभिनेता राज गोहिल, निर्माते कृष्णा शेलार, रमेश आलमेलकर, अभिनेत्री राजश्री काळे, सोनाली अस्वले आणि बाल कलाकार पियुष पवार यांच्या उपस्थितीत, घरगुती वातावरणात “आॕक्सिजन” या लघुचित्रपटाचा मुहुर्त नुकताच पार पडला.
हा लघुचित्रपट मराठी आणि कन्नड या द्विभाषांत होत आहे. स्त्रीप्रधान असलेला हा चित्रपट एका स्त्री च्या भोवती फिरत राहतो.
एकत्र कुटुंब सांभाळून, नोकरी करणारी, सुशिक्षित अशी ही मध्यम वर्गीय स्त्री आपली सर्व कर्तव्य पार पाडून, आयुष्यातील शेवटच्या टप्प्यात घर सोडून शिवानंद आश्रमात निघून जाते.
तिला आता तिचं स्वतःच तिच्या मनासारखं खरं आयुष्य जगायचं आहे. मनातील दाबून ठेवलेले छंद जोपासायचे आहेत. खरं तर आता तिला मोकळा श्वास घ्यायचा आहे. खरा “आॕक्सिजन” मनोसोक्त घ्यायचा आहे.
कोणालाही अडचण, दोष देण्यापूर्वीच, कोणालाही न दुखवता आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य पार पाडून योग्य वेळेवर आपण स्वतःहून या संसारी मायाजालातून आनंदाने बाहेर पडायचंय. आपल्या वयाच्या मित्र-मैत्रीणी, आपल्या आवडी, जगण्यासाठी लागणारा हाच खरा “आॕक्सिजन” मिळवायचाय. हाच संदेश या चित्रपटातून मिळतो.
या लघुचित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीत सौ. सुरेखा अशोक गावंडे यांचे आहे. चित्रपटाचे निर्माते कृष्णा शेलार तर निर्मिती व्यवस्था रमेश आलमेलकर आणि दिग्दर्शन, छायाचित्रण सचिन लोखंडे यांचे आहे. पार्श्वसंगीत सिद्धेश तळोकर तर रंगभूषा सुनिल सावंत यांची आहे.
या लघुचित्रपटातील कलाकार राज गोहिल, चंदन पाटील (बेळगाव), राजश्री काळे, सुमीत राजगुरु, अक्षय कांबळे, रमेश आलमेलकर, मधुकर शिर्के, सोनाली अस्वले आणि सुरेखा गावंडे आहेत. बाल कलाकार पियुष पवार, सारा गव्हाणे, विशेष भूमिकेत जयराज नायर आहेत.
श्री विशाल पवार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, मुंबई यांचे विशेष सहाय्य लाभले आहे. हा लघुचित्रपट कधी पहायला मिळतो, इकडे सर्व रसिकांचं लक्ष लागलं आहे.
सर्व स्त्रियांच्या जिव्हाळ्याच्या विषयाला हात घातल्याबद्दल विशाल कृष्णा निर्मित, “ऑक्सिजन” च्या सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन.
– अलका भुजबळ. 9869484800.
एक नवीन धाटणीचा, नवीन विचाराचा लघु चित्रपट ऑक्सिजन येतोय त्यास हार्दिक शुभेच्छा 🌹
“ऑक्सिजन”या आपल्या द्विभाषी लघुपटाच्या निमित्ताने आपले सहर्ष हार्दिक स्वागत, अभिनंदन व शुभेच्छा.उत्तरोत्तरआपल्या हातून अशाच सकस, दर्जेदार, श्रवणीय,प्रेक्षणीय पूर्ण लांबीच्या चित्रपट निर्माण होवो हीच श्री चरणी मनोमन प्रार्थना. शुभेच्छा.
खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या सहकार्यांना..
आम्ही वाट पाहतोय लघुपट पाहण्याची, लवकर सादर करा..
सुरेखा अभिनंदन विषय छान आहे
पुढील वाटचाली साठी शुभेच्छां.