Home बातम्या इख्लास रमजान अंक : थाटात प्रकाशन

इख्लास रमजान अंक : थाटात प्रकाशन

0

रमजान विशेष अंक इख्लासचे प्रकाशन नुकतेच संपन्न झाले. ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेद्वारे प्रकाशित हा दुसरा अंक आहे. या अंकाचे संपादक अनिसा सिकंदर शेख, उपसंपादक खाजाभाई बागवान, कार्यकारी संपादक मंडळ सदस्य तहेसीन सय्यद, समैय्या चौधरी, निलोफर फणीबंद, नसीम जमादार, प्रकाशक इंतेखाब फराश यांच्या प्रयत्नातून साकार झाले.

इख्लास रमजान अंकाचे प्रकाशन साहित्यिक व संपादक मा. सलीम खिलजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

कवीसंमेलन – :
मा. गझलकार मसूद पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलन झाले. ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेच्या सचिव अनिसा सिकंदर, संस्थेचे उपाध्यक्ष इख़्लास अंकाचे सहसंपादक खाजाभाई बागवान, डॉ. प्रा. गझलकार सतीश देवपूरकर, मा. गझलकार मसूद पटेल, पुणे जिल्हा अध्यक्ष बा.ह मगदूम, सचिव मेहमूदा शेख, कवयित्री मिनाज शेख, सोलापूरच्या जिल्हाध्यक्ष व पानगलच्या प्राचार्य डॉ. सुरैय्या जहागीरदार, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व बालसाहित्यिका नसीम जमादार, मा. गझलकारा निलोफर फणीबंद, कवी राहुल भोसले इ. मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात कुराणच्या आयत पठनाने इंग्रजी लेखक सलीम शेख यांनी केले. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपले मनोगत रमजान चे महत्व व विविधतेतून एकता या विषयावर आपापली मते व्यक्त करुन भाईचारा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या अंक निर्मिती करणाऱ्यांना सर्वांना शुभेच्छा दिल्या.

सलीम खिलजी व संपादिका अनिसा सिकंदर यांनी आपल्या मनोगतात आजची सामाजिक परिस्थितीवर व समाजात दूषित झालेल्या वातावरणावर भाष्य केले. त्यांची आपल्या मनोगतात म्हटले की अशा अंकाची आज समाजाला गरज आहे. त्यावर विचार मंथन होईल. समाजातील बांधिलकी वाढण्यास मदत होईल. ह्या अंकात रमजान विषयी सखोल माहिती देण्यात आली आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले. सोशल कॉलेजचे प्राचार्य इ. जा. तांबोळी, कासिदचे संपादक अय्युब नल्लामंदू, संस्थेचे संस्थापक शेख शफी बोल्डेकर व सहसंपादिका तेहसीन सय्यद यांच्या ह्या कार्यक्रमासाठी शब्द रुपी विशेष शुभेच्छा लाभल्या.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा. नसीम जमादार व मा. गझलकारा निलोफर फणीबंद यांनी केले. तर आभार प्रदर्शन चेरी स्कूलचे मुख्याध्यापिका परविन फराश यांनी केले.

“देवेंद्र भुजबळ यांचा लेख”
या अंकात आपल्या न्यूज स्टोरी टुडे पोर्टल चे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांचा राष्ट्रीय एकात्मतेचे महत्व सांगणारा “आमचा वाडा” हा लेखही आहे. लवकरच आपल्या पोर्टलवर सदरचा लेख स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येत आहे.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version