Friday, December 26, 2025

इगो

काय विचारता
इगो कुठे असतो ?
स्वभावात दडलेला
कधीतरी दिसतो

इगोनं फार
वाटोळं होतं
होत्याचं नव्हतं
नव्हत्याचं होतं

इगो दुखावला गेला
ऐकू येतं कानी
असतात काही
माणसं पोकळ मानी

इगो बाजारात
मिळत नाही
भाजीपाला नाही
म्हणून पिकत नाही

इगो वर बंदी
करता यायला हवी
पाण्यात अग्नीत
विरायला हवी

इगो बँकेत ठेवून
व्याज मिळाले असते
तर एफडीला
मर्यादा घाल म्हटले नसते

इगो कचरा समजून
घंटागाडीत टाकू म्हटलं
दिसत नाही हा कचरा
म्हणत घंटागाडीवाल्यानं डिवचलं

कविता बिरारी

– रचना : कविता बिरारी. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. सुंदर चित्र साजेसे कविता शोभून दिसली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अलका वढावकर ठाणे on माझी जडणघडण : ७८
पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”