Thursday, September 18, 2025
Homeसाहित्यउघड आई डबा आता...

उघड आई डबा आता…

चाल : देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा,
उघड दार देवा आता..

तिळाची ही वडी
लाडु तिळगुळाचा
उघड आई डबा आता
उघड आई डबा ॥ धृ ॥

येतो सण संक्रांतीचा
मनी हर्ष लाडवांचा
परी आई का ग तु तो डबा लपवावा
चटावल्या जिभांनीही तोल सावरावा ॥ १ ॥
उघड आई डबा आता …..

दुपारी तु निजशी आई
म्हणुन केली घाई
दचकलो कितीतरी
बाजु उभी ताई
तिच्या त्याच
चुगल्यांवर तु
भरवसा ठेवावा ॥ २ ॥
उघड आई डबा आता उघड आई डबा

सकाळी ग बबल्याची मी पतंग काटली
म्हणुन भरपाई केली कबुल चार लाडवांची
कृपा करी आई आता प्रश्न इभ्रतीचा ॥ 3 ॥
उघड आई डबा आता ….

सुजाता येवले

– रचना : सुजाता येवले.
– संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा