उजळत राहू ज्ञानदीपाला
भोवतालचा तम घालवू
स्वच्छ दिसावी विचार वाट
सुविचारांची ज्योत पाजळू !!
आपुलकीचा हात देवूनी
सावरू या मना मनाला
निराशा तथा काळजीस
या नष्ट करूनी धीर द्यायला !!
मान्य करूनी नियतीलाही
बेधडकपणे द्यावे उत्तर
समर्थ आहे जीवन जगण्या
मन बुद्धी ही आपुली कणखर !!
जीवन असते युध्द खरोखर
क्षणाक्षणाला लढावयाचे
संकटासही टक्कर देण्या
सतत जागरूक रहावयाचे !!

— रचना : अरूणा दुद्दलवार
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

अप्रतिम.
विचारधारा चांगली असली की काव्यातही
सुविचार सुकल्पना येतात.
सकारात्मक रचना.