Saturday, March 15, 2025
Homeकला‘उड जा नन्हे दिल’

‘उड जा नन्हे दिल’

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नॅशलन फिल्म डेव्हलमेंट कार्पोरेशनतर्फे ‘उड जा नन्हे दिल’ या चित्रपटाची 87 व्या टोरांटो आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड करण्यात आली आहे.

सुनिल शेट्टी यांची प्रमुख भूमिका असलेला या चित्रपटाची निर्मिती नवरस एंटरटेमेंटतर्फे ऐश्वर्या यादव, श्रीया तोरणे आणि ध्रुव करुणाकर यांनी केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक श्री. स्वरुप राज मेदारा हे असून श्री. सादवन क्वाड्रस हे क्रियेटिव्ह प्रोडयुसर आहेत.

याविषयी बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक श्री. राज मेडारा यांनी सांगीतले की, नॅशलन फिल्म डेव्हलमेंट कार्पोरेशनवे सीईओ श्री. रविंदर भाकर यांनी चित्रपटात अफाट क्षमता पाहिली आणि आम्हास प्रोत्साहित केले. ‘उड जा नन्हे दिल’ चित्रपट कथेतील शुद्धता व त्याच्या भावना प्रत्येक व्यक्तीच्या आत्म्याला स्पर्श करणाऱ्या आहेत. लहान मुले असो वा प्रौढ, श्रीमंत किंवा गरीब समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींसाठी ही एक कथा आहे जी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत आहे असे त्यांनी सांगितले.

चित्रपटाचे निर्माते श्री. ध्रुव करुणाकर यांनी सांगितले की, टोरांटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘उड जा नन्हे दिल’चा प्रीमियर होत आहे. हा लहान मुलांचा चित्रपट असला तरी यात पालकांसाठीही एक सुंदर संदेश चित्रपटात आहे. नॅशलन फिल्म डेव्हलमेंट कार्पोरेशनच्या सहकार्याने हा चित्रपट आंतराराष्ट्रीय स्तरापर्यंत यश मिळणे शक्य झाले आहे.

या चित्रपटाबद्दल बोलतांना अभिनेता सुनील शेट्टी यांनी सांगितले की, हा लहान मुलांबद्दलचा चित्रपट आहे. कामाची प्रत्येकाला समान संधी देणे आवश्यक आहे. आधुनिक काळातील पालकांसाठी हा चित्रपट नक्कीच प्रेरणादायी आहे. समानतेवर विश्वास ठेवणारी सध्याची पिढी आहे. मुलांनी कसे जगावे अशी इच्छा असणारे अनेक पालक आहेत. पालकांचा प्रामाणिकपणा आणि ते मुलांची घेत असलेली काळजी ही एक साधी गोष्ट या कथेतून मांडण्यात आली आली असल्याचे त्यांनी सांगितले.

चित्रपटाच्या सहनिर्माती श्रीया तोरणे यांनी सांगितले की, ‘उड जा नन्हे दिल’ चित्रपटात अभिनेता सुनील शेट्टी एका हायप्रोफाइल शाळेच्या मुख्याध्यापकाच्या भूमिकेत आहे. त्यांना रघू नावाचा एक हुशार मुलगा भेटतो. जो गरीब परिवारातील मुलगा आहे. ते मुख्याध्यापक आपल्या प्रसिद्ध शाळेत श्रीमंत कुटुंबातील मुलांसोबत शिकण्याची संधी देतात. रघूला सुरुवातीला भीती आणि न्यूनगंडाचा अनुभव येतो, पण जसजसा काळ जातो तसतसे त्या शाळेत त्याचे जिवलग मित्र बनतात. मैत्रीचे एक सुंदर बंधन सुरू होते, अशी या चित्रपटाची कथा आहे.

ह्या चित्रपटाचे शुटींग अवघ्या सदतीस दिवसात पूर्ण झाले आहे. आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी याचे शीर्षक ‘फ्लाय हाय लिटल हार्ट्स’ असे आहे. लहान मुलांच्या कथेतून भावनीक स्पर्श करणारा चित्रपट विलोभनीय आहे. टोरांटो आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झालेला हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीला नवीन उंचीवर नेऊन ठेवणारा आहे.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments