Monday, July 14, 2025
Homeकला‘उड जा नन्हे दिल’: एशियन प्रीमियर

‘उड जा नन्हे दिल’: एशियन प्रीमियर

मुलांच्या मानसिक आरोग्यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या
‘उड जा नन्हे दिल’ या चित्रपटाचा गोव्यातील 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आशिया प्रीमियर संपन्न झाला.

यापूर्वी युनिसेफतर्फे बालहक्कांच्या प्रसारासाठी या चित्रपटाचे प्रसारण करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. नवरस एंटरटेनमेंट व स्क्रिप्टो प्रॉडक्शनच्या संयुक्त विद्यमाने निर्मिती सुप्रसिध्द अभिनेता सुनिल शेट्टी यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीला नवीन उंचीवर नेऊन ठेवणारा आहे.

या चित्रपटाची निर्मिती ऐश्वर्या यादव, सचिन जैन, प्रशांत काळे, श्रिया तोरणे आणि ध्रुव करुणाकर यांनी केली आहे.

याप्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक श्री. राज मेडारा यांनी सांगीतले की, कुटुंबातील मुलगी असो वा मुलगा, मग ते झोपडपट्टीत राहोत किंवा गगनचुंबी इमारतीत, प्रत्येकाला संधी मिळायला हवी” ही देखील या चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना आहे.

क्रिएटिव्ह प्रोड्युसर सायविन क्वाड्रास, (मेरी कॉम, नीरजा, परमानु आणि मैदानचे प्रसिद्ध पटकथालेखक) आणि पटकथा आणि संवाद लिहिणारे विशाल कपूर यांनी एकत्रितपणे वास्तववाद आणि निरागसतेने कथा रचली आहे. चित्रपटात बिनशर्त मैत्रीबद्दल भावना आणि आनंद असलेले एक खेळकर नाटक आहे असे त्यांनी सांगितले.

या चित्रपटाबद्दल बोलतांना अभिनेता सुनील शेट्टी यांनी सांगितले की, मुलांचे एकूण मानसिक आरोग्य आणि अभ्यासामुळे विद्यार्थ्यांना भेडसावनाऱ्या मानसिक समस्यांचे महत्त्व लक्षात घेऊन हा चित्रपट तयार केला आहे.

निर्माता ध्रुव करुणाकरन यांनी सांगितलें की, झोपडपट्टीतील एका लहान मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुख्याध्यापकाकडून शिकण्याची संधी मिळाल्याची हृदयस्पर्शी कथा असलेला हा चित्रपट आहे. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील मुलांचा एकमेकांच्या पाठीशी उभा राहण्याचा प्रवास या कथेत मांडला आहे.

चित्रपटाच्या सहनिर्मात्या श्रीया तोरणे यांनी सांगितले की, अभ्यासाच्या दबावामुळे विद्यार्थ्यांना आलेला मानसिक ताण लक्षात घेऊन आणि आत्म निर्भर भारत निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून झोपडपट्टीतील मुलाला त्याच शाळेच्या मुख्याध्यापकाकडून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकण्याची मिळालेली संधी या चित्रपट हृदयस्पर्शी कथा मांडली आहे. वेगवेगळया सामाजिक स्तरातील मुलांचा एकमेकांच्या पाठीशी उभा राहण्याचा प्रवास ‘उड जा नन्हे दिल’ चित्रपटात पहाता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्राच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नॅशलन फिल्म डेव्हलमेंट कार्पाेरेशनतर्फे ‘उड जा नन्हे दिल’ या चित्रपटाची निवड नुकत्याच झालेल्या टोरांटो आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलसाठी करण्यात आली होती.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments