चला जाऊ गावाला
गावाकडची आमराई
सुट्टीत मजा करु
बॅग भरावी घाई घाई
आजी वाट पाहते
चिमुकले कधी येणार
आजीला नेतो खाऊ
आजी नाहीच ऐकणार
म्हणते कशी आजी
चला शेताकडे जायचे
नव्याने आल्या भाज्या
तुम्हा मुलांना शिकायचे
आजी सांगते आम्हां
कांदा मुळा कच्चे खायचे
आरोग्यासाठी छान
सुदृढतेने जगायचे
आमरस खायचा
किती प्रकार करतात
वडी पोळी पदार्थ
पन्हे ऊन्हाळ्यात पितात
आमराईत झोके
झाडाला ऊंच बांधणार
छान कविता म्हणा
पाठा़ंतर सर्व होणार
कच्ची कैरी कापावी
मीठ मिरची लावायची
काकडी बीट खात
मजा मस्ती व्हायची
– सौ शोभा कोठावदे मुंबई
शोभा कोठावदे यांची कविता- उन्हाळ्याची सुट्टी एक सुरेख बालगीत आहे.शहरातील मुलं आपल्या गावी गेल्यावर तिथल्या माणसांकडून आणि निसर्गाकडून भरभरून मिळणा-या आनंदाचे सुरेख वर्णन या कवितेत आढळून येते.