Friday, January 2, 2026

उमेद…

ज्या भूतकाळाने जीव व्याकूळ होतो;
त्या आठवणींच्या गावाकडे फिरकूच नाही,
पळ कधीच काढायचा नाही पण;
पुनःपुन्हा त्या वाटेवर मनाला भरकटून द्यायचे नाही.

परीक्षा काही संपणार नाही;
चिंता पाठ सोडणार नाही पण,
कुठल्याही परिस्थितीत;
सत्य आणि धैर्याची साथ सोडायची नाही.

समजून घेणे ही काही तडजोड नाही;
तो चांगुलपणा असतो,
आपला आनंद मिळवताना;
दुसऱ्यांच्या दुःखाचं कारण व्हायचं नाही.

अपयशाचा स्वीकार करण्याची कला अवगत केली की;
तो पराभव नाही हे आपसूक कळतं,
कोणी कितीही दुखावलं तरीही;
चांगुलपणाने वागण्याचा समजूतदारपणा आपोआपच येतो.

निस्वार्थ भावनेने प्रेम करावं पण;
आंधळ्या प्रेमात झोक जाऊ द्यायचा नाही,
डोळ्यावर प्रेमाची पट्टी बांधून;
खऱ्या खोट्याची पारख करण्यात चुकायचं नाही.

कठीण परिस्थिती नातं तोडत नसते;
तर ती नात्याची वीण मजबूत करते,
हीच नात्यांची परीक्षा असते;
जी खऱ्या चेहऱ्याची ओळख करून देते.

स्वप्नं सत्यात साकारोत न साकारोत;
ती रंगवत राहायची,
कुठल्याही वादळाने उन्मळून न पडता;
प्रत्येक संकटातून शिकवण घेऊन उमेदीने भरारी घ्यायची !

— रचना : योगिनी चेतन पंडित. डोंबिवली
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments