Home बातम्या ऍड विजयसिंह जाधवराव यांचे निधन

ऍड विजयसिंह जाधवराव यांचे निधन

0

कोकणातील दैनिक कुलाबा शिवतेज वृत्तपत्राचे संपादक ऍड विजयसिंह जाधवराव यांचे आज दुपारी हृदयविकाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. महाड सारख्या दुर्गम ठिकाणी त्यांनी अत्यंत चिकाटीने गेली अनेक वर्षे दैनिक चालविले होते. आधुनिक अभ्यासक्रम शिकविणाऱ्या त्यांच्या नवयुग विद्यापीठ या संस्थेने कोकणातील हजारो मुलामुलींच्या जीवनात क्रांती घडवली. महाड परिसराच्या शैक्षणिक, आर्थिक,औद्योगिक, सामाजिक विकासात त्यांचे शेवटपर्यंत सक्रिय योगदान होते.
गौरवशाली सरदार घराण्यातील असूनही ते अत्यन्त निगर्वी, मनमिळाऊ, दिलखुलास स्वभावाचे होते. त्यामुळे त्यांना मोठा मित्र परिवार लाभला होता. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलं,मुलगी, सुना,जावई, नातवंडं असा परिवार आहे.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version