असा एकांताचा पक्षी
घुमे मनी निरंतर
चराचर एक होई
मिळे धरा नी अंबर।
दूर उगवे पहाट
लाल क्षितिजाशी गोळा
भेटे पूर्वेच्या नक्षीला
सूर्यसखा हा वेल्हाळा।
मन विजनाशी भेटे
असा मधुर एकांत
जिवा शिवाचे हे नाते
मन उदार अनंत।

– रचना : अनुपमा मुंजे.
असा एकांताचा पक्षी
घुमे मनी निरंतर
चराचर एक होई
मिळे धरा नी अंबर।
दूर उगवे पहाट
लाल क्षितिजाशी गोळा
भेटे पूर्वेच्या नक्षीला
सूर्यसखा हा वेल्हाळा।
मन विजनाशी भेटे
असा मधुर एकांत
जिवा शिवाचे हे नाते
मन उदार अनंत।
– रचना : अनुपमा मुंजे.
🌹सुंदर कविता 🌹
अशोक साबळे
अंबरनाथ