आज, 25 जानेवारी, मतदार दिन आहे. या निमित्ताने एका मतदाराने मांडलेली मते पुढे देत आहे.
– संपादक
राज्यात, देशात विविध राजकीय घडामोडी घडत असतात. बिचारे मतदार, एकदा मतदान केले, की पुढील मतदानाची वाट पाहण्याशिवाय काही करू शकत नाही.
या बाबतीत मला पुढील गोष्टी सुचवाव्याश्या वाटतात.
1. लोकसभा आणि विधानसभेची निवडणूका एकदम घ्याव्यात. दोन्ही वेळी होणाऱ्या खर्चाची बचत होईल. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेळेची बचत होईल.
2. खून, बलात्कार आणि खंडणी सारखे गुन्हे दाखल झालेल्याना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात यावे.
3. निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी लाखो-करोडो रुपये खर्च होतात. जे एवढे पैसे खर्च करू शकतात तेच निवडून येतात आणि चांगले उमेदवार निवडून येत नाहीत.
निवडणुकीचा प्रचार फक्त इलेक्ट्रॉनिक मीडिया वर करण्यास परवानगी देण्यात यावी. त्याचा खर्च सरकारने करावा. त्यामुळे निवडणुकीवरील खर्च कमी होईल आणि चांगले, सुशिक्षित, सुसंस्कृत आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेले उमेदवार निवडून येतील.
4. निवडून आलेले सरकार व्यवस्थित चालू द्यावे. विरोधी पक्षाने कोणत्याही प्रकारचे महत्व नसलेले आरोप करू नयेत. उदा. “काना खाली मारली असती” असे आरोप करून पोलीस, कोर्ट आणि तत्सम सरकारी कर्मचार्यांवरील कामाचा त्रास वाढवू नये.
5. विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आपआपले व्यवसाय संभाळावेत आणि सरकारला काम करून द्यावे. रोज उठून नवनवीन आरोप सरकार वर करू नयेत.
सर्व सरकारी यंत्रणा आणि मीडिया, सरकार आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या बिनकामी कामासाठी जास्त वेळ जुंपलेली असते. सरकारी कर्मचाऱ्यांना समाज उपयोगी कामे करण्यास जास्तीत जास्त वेळ उपलब्ध होईल, असे पहावे.

– लेखन : प्रकाश मांगले. नवी मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800