आहो काका नाना
एक कप चहा
ईकडे या टपरीवर
पिऊन तर पहा
आले, गवती पानं
घातली वाटून
वेलदोड्याची खमंग
येई दाटून
सर्दी, कफ झाला
यावे जरा ईकडे
आले, तुळशीने
येणार नाही बेडके
आहो ! कुठल्या प्रकारचा चहा हवा
काळा, कोरा, लेमन
हुकुम देत रहा
दुध घातले घोटून
जशी बासुंदी
चहा पिता उडेल
डोळ्याची धुंदी
कंपन्या झाल्या
सतराशे साठ
आम्हा हवी केवळ
चहाशी गाठ
पेपर हाती घेऊन
हाती चहा घ्यावा
सुख दुःखा सवे
गप्पा ताज्या व्हाव्या
पावसाळा येता
गरम भजी स्वाद
चहा सोबत घेती
सारे आस्वाद
पावसाळा थंडी
मजेशीर ऋतू
प्रेम पहा चहावर
येऊ लागे उतू
अतिथी स्वागताला
चहाचा मान
बाराही महिने
ह्याचेच उच्च स्थान
– रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800