एक तरी झाड तुम्ही यंदा लावा बरं
नाही तर भविष्य नाही तुमचं खरं
एक झाड वाचवते कितीतरी जीव
झाड म्हणजे पाण्याचा जमिनीतील पेव…
कितीतरी पाणी साठा असतो मुळाशी
घट्ट धरून ठेवतात माती मुळे तळाशी
बारा महिने थंडगार देतात पहा हवा
झाडे म्हणजे सुखाचा निरंतर ठेवा…
देणे फक्त माहित आहे आपल्या साठीच
जगत असतात किती तरी झाडे ….
मूकपणे काम करणे
हाच त्यांचा सेवाधर्म
झाडे शिकवतात जगास जगण्याचे मर्म
“ए टू झेड” देऊन टाकतात
ठेवत नाही काही
एकेक झाड म्हणजे असते आपली”आई”…
आईसारखेच जोजवतात
झुल्यावरती पक्षी
चांदण्यात उतरते अंगणात नक्षी
हिरवेकंच दृष्टीसुख
फुले फळे मेवा
अपार आहे देणे त्यांचे मनसोक्त खावा…
झाडा सारखे होता आले, देता आले सारे
माझ्यासारखा भाग्यवान “मीच”समजानारे
कधी तरी आपण सुद्धा झाड होऊन पाहू
देण्यात किती सुख असते अनुभव घेऊ …

– रचना : प्रा.सौ.सुमती पवार
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
Poem on tree is beautiful and congratulations to poet Sumati. The last line is mind blowing!