Thursday, February 6, 2025
Homeबातम्याएक वही, एक पेन !

एक वही, एक पेन !

भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर या महापरिनिर्वाणदिनी त्यांना आदरांजली वाहताना हारफूले, मेणबत्ती, अगरबत्ती ऐवजी वह्या आणि पेन तसेच शैक्षणिक साहित्य वाहून त्यांना आदरांजली वाहावी, असे आवाहन ‘एक वही, एक पेन’ अभियानाच्यावतीने करण्यात आले आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी आदरांजली वाहण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर देशविदेशातून लाखो लोक येत असतात. यावेळी ते हारफूले, मेणबत्ती अगरबत्ती, वाहून या महामानवाला आदरांजली वाहतात. या वस्तूंचा नंतर काहीच वापर किंवा उपयोग होत नाही. हे सर्व साहित्य वाया जाते.

त्यामुळे या वस्तूंऐवजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी “शिक्षणाची” शिकवण दिल्याप्रमाणे वह्या-पेन जर त्यांच्या चरणी वाहिल्या तर तीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली ठरेल, असे आवाहन “एक वहीं, एक पेन” अभियानचे प्रमुख, ज्येष्ठ पत्रकार राजू झनके यांनी केले आहे.

महापरिनिर्वाणदिनी हारफुलांऐवजी वहींपेनांची आदरांजली हे वही पेनची चळवळ झालेले अभियान मागील सहा वर्षांपासून चैत्यभूमी, दादर तसेच दीक्षाभूमी, नागपूरसह राज्यात बहुसंख्य ठिकाणी विविध संघटनांच्या माध्यमातून चालविले जात असून ज्यांना या दोन्ही ठिकाणी येणे शक्य होत नाही त्यांनी आपापल्या विभागात हे अभियान राबवावे असे आवाहन झनके यांनी केले आहे.

राजु झनके

जमा झालेले हे शैक्षणिक साहित्य सर्वच समाजातील गोरगरिब विद्यार्थ्यांना दिल्यास त्यांच्या शिक्षणाला हातभार लागेल या उद्देशानेच हे अभियान राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

गत वर्षाप्रमाणे यावेळी हे अभियान मुंबईत, चेंबूर पूर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामागे महामानव प्रतिष्ठानच्या वतीने राबविले जात असून चैत्यभूमीवरील शिवाजी पार्क या ठिकाणी भीम आर्मी तसेच फॅम या संघटनेच्यावतीने देखील हे अभियान चालविण्यात येत असून आंबेडकरी जनता तसेच ज्यांना ज्यांना या अभियानात आपला सहभाग नोंदविण्याची इच्छा असेल त्यांनी चेंबूर आणि शिवाजी पार्क येथे हे साहित्य घेऊन यावे. अधिक माहितीसाठी ९३७२३४३१०८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही झनके यांनी केले आहे.

– देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. खुप छान उपक्रम. असे उपक्रम सगळ्या बाबतीत राबवतां यावेत. मा. झणके यांचे अभिनंदन व मा. देवेंद्रजींनी माहिती दिली म्हणून त्यांचे आभार.

  2. झनके साहेब आम्ही आपले आभारी आहोत.
    आम्ही आपल्या संकल्पनेचे मनःपूर्वक स्वागत करतो.
    अभिनंदन करतो. “एक वही, एक पेन”आम्ही आमचा
    सहभाग नोंदवतो.
    धन्यवाद साहेब.

  3. एक स्तूत्य उपक्रम…. कर्मकांडात अडकण्यापेक्षा आणि शिक्षणासाठीच गुंतवणूक करा हा संदेश या कार्यामुळे लोकांना मिळेल….व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार तो म्हणजे “शिकेल तोच टिकेल” व
    “वाचाल तर वाचाल” ” शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा” या विचारांचे पालन होईल.

    धन्यवाद मा.राजु झनके सर
    आणि संपादक साहेब मा. देवेंद्रजी भुजबळ
    आपले हार्दिक हार्दिक आभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी