ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे १८ वे अधिवेशन नांदेड येथील पिपल्स कॉलेजच्या कुरुंदकर सभागृहात नुकतेच मोठया उत्साहात पार पडले,
या अधिवेशना साठी प्रमुख पाहुणे म्हणुन निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई हे होते.
यावेळी बोलताना श्री भुजबळ यांनी आपल्या भाषणात पत्रकाराला समाजात वावरत असताना बातमी मिळवण्या साठी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो तरीही तो न डगमगता वृत्त संकलन करीत असतो असे सांगून जनतेच्या समस्या शासना पर्यंत पोचवून प्रशासनाला जागेकरण्याचे काम हा पत्रकार करीत असतो. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पत्रकारांनी सडेतोड लिखाण करण्यासाठी आपली लेखणी झिजवावी असे मत मांडले.
याचवेळी श्री, भुजबळ यांनी अधिस्वीकृती संदर्भात सविस्तर माहिती देऊन पत्रकारांमध्ये असलेले गैरसमज दुर केले.
अध्यक्षपदावरून बोलताना भारतीय पत्रकारितेच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेऊन पत्रकारांनी स्वत्व गमावू नये, आपल्या तत्वांशी तडजोड करू नये असे आवाहन श्री जतिन देसाई यांनी केले.
संस्थापक अध्यक्ष श्री, यासिन पटेल यांनी या संस्था स्थापन्यामागील कारणे आणि संस्थेची ध्येय्य धोरणे याबाबत माहिती दिली.
या अधिवेशनात ‘मी अवयव दाता’ या संघटनेचे कार्यकर्ते श्री माधव अटकोरे ही उपस्थितीत होते .त्यांनी मृत्युपश्चात आपले अवयव दान करणे कसे गरजेचे आहे या विषयी मार्गदर्शन केले.
तोच धागा पकडून संघटनेचे विश्वस्त, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी मृतदेह हा राष्ट्रीय संपत्ती म्हणुन जाहिर करावा, आणि ज्याप्रमाणे, हगणदारी मुक्त गाव, तंटामुक्ती गाव याचा धर्तीवर स्मशानमुक्त गाव अशी घोषणा शासनाने करुन त्या गावाला रोख रक्कम बक्षीस म्हणुन जाहिर करावी अशी मांगणी करताना आपण लवकरच असा स्मशान मुक्त गाव संगमेश्वर तालुक्यात करीत आहोत असे अभिवचन दिले.
आतापर्यंत दोनशेहून अधिक देहदान करणाऱ्यांचे अर्ज दखल झाले असुन त्या पैकी सहा जणांनी आपल्या मृत्युपश्चात देह दान केल्याची माहिती दिली.
केंद्रीय अध्यक्ष श्री गणेश कोळी, विश्वस्थ, श्री युयुत्सु आर्ते, श्री अतुल होनकळसे, मराठी भाषातज्ञ प्रा संगीता घुगे, नांदेडचे माजी खासदार श्री व्यंकटेश काबदे, नांदेडचे जिल्हा माहिती अधिकारी, श्री विनोद रापतवार, केंद्रीय सचिव श्री बाळकृष्ण कासार, कोषाध्यक्ष श्री सत्यवान विचारे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी राज्यभरातील नामवंत पत्रकारांचा प्रेरणा पुरस्काने गौरव करण्यात आला.
यावेळी सर्व केंद्रीय आणि प्रदेश समिती सदस्य, यांच्या बरोबर राज्यभरातून पत्रकार उपस्थित होते.
— लेखन : सत्यवान विचारे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800