Wednesday, September 17, 2025
Homeपर्यटनएण्‍टेबे ते मुंबई विमानसेवा सुरू

एण्‍टेबे ते मुंबई विमानसेवा सुरू

युगांडा एअरलाइन्‍सने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्‍ट्रीय विमानतळ आणि युगांडामधील एण्‍टेबे आंतरराष्‍ट्रीय विमानतळ यांना जोडणाऱ्या नवीन विमानसेवेच्‍या लाँचसह भारतातील कार्यसंचालनांच्‍या शुभारंभाची नुकतीच घोषणा केली. ही विमानसेवा ७ ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहे. दोन्‍ही शहरांमध्‍ये आठवड्यातून तीनदा ही विमानसेवा कार्यरत असेल आणि त्‍यांच्‍या एअरबस ए३३०-८०० निओ विमानामधून प्रवास करण्‍याची सुविधा दिली जाईल.

ही विमानसेवा तीन क्‍लास कन्फिग्‍युरेशनमध्‍ये प्रवास करण्‍याची सुविधा देईल : बिझनेस (२० सीट्स), प्रिमिअम इकॉनॉमी
(२८ सीट्स) आणि इकॉनॉमी (२१० सीट्स).

५० वर्षांमध्‍ये पहिल्‍यांदा ही उत्‍साहवर्धक विमानसेवा देण्‍यात येणार आहे, जेथे भारत व युगांडा नॉन-स्‍टॉप विमानसेवेच्‍या माध्‍यमातून कनेक्ट होतील.

ही विमानसेवा आफ्रिकन खंडाबाहेर युगांडा एअरलाइन्‍सच्‍या सेवेचा विस्‍तार करते आणि झपाट्याने विस्‍तारित होत असलेल्‍या नेटवर्कमध्‍ये सामील होते, जेथे प्रवाशांना दक्षिण, पश्चिम, मध्‍य व पूर्व आफ्रिकेपर्यंत सोईस्‍करपणे प्रवास करता येईल.

या विमानप्रवासासाठी एकमार्गी जवळपास साडे-पाच तास लागतील, ज्‍यामधून प्रवाशांना व्‍यवसायाकरिता, कौटुंबिक ट्रिपकरिता किंवा पर्यटनाकरिता उत्तम व सोईस्‍कर विमानप्रवासाची सुविधा मिळेल.
”आम्‍हाला आमच्‍या नेटवर्कमध्‍ये या नवीन विमानसेवेला सादर करताना आनंद होत आहे, ज्‍यामधून युगांडा एअरलाइन्‍स प्रवाशांसाठी ट्रॅव्‍हल पर्यायांमध्‍ये वाढ करत असल्‍याची खात्री मिळते. सोयीसुविधेव्‍यतिरिक्‍त आम्‍ही आशा करतो की, ही विमानसेवा विद्यमान व्‍यवसायामध्‍ये, तसेच शतकापासून असलेल्‍या भारत व युगांडामधील व्‍यावसायिक संबंधांमध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करेल,’ असे प्रमुख व्‍यावसायिक अधिकारी श्री. अॅडेडयो ओलावुयी म्‍हणाले.

”२०१७ पासून मी मुंबई ते एण्‍टेबेपर्यंत थेट फ्लाइटचे स्‍वप्‍न पाहत होतो, ज्‍यामुळे दोन्‍ही देशांमधील व्‍यापार, वाणिज्‍य व पर्यटनाला चालना मिळते. माझे स्‍वप्‍न पूर्ण होत असल्‍याचे पाहून मला आनंद होत आहे,” असे युगांडाचे मा. कौन्‍सुल एच. ई. मधुसुदन अग्रवाल म्‍हणाले.

युगांडामधून उद्घाटनीय फ्लाइट यूआर ४३० एण्‍टेबे येथून शनिवार ७ ऑक्‍टोबर रोजी उड्डाण घेईल आणि रिटर्न फ्लाइट यूआर ४३१ मुंबईमधून रविवार ८ ऑक्‍टोबर रोजी उड्डाण घेईल.

युगांडा एअरलाइन्ससाठी फ्लाइट वेळापत्रक :

फ्लाइट क्र. प्रस्‍थान विमानतळ प्रस्‍थान वेळ (स्‍थानिक) आगमन विमानतळ आगमन वेळ (स्‍थानिक) कार्यसंचालनाचे दिवस
यूआर ४३० एण्‍टेबे (ईबीबी) रात्री ८.१५ वाजता मुंबई (बीओएम) सकाळी ५.५५ वाजता सेामवार, बुधवार, शनिवार
यूआर ४३१ मुंबई (बीओएम) सकाळी ७.५५ वाजता एण्‍टेबे (ईबीबी) दुपारी १२.२५ वाजता मंगळवार, गुरूवार, रविवार.

युगांडामध्‍ये प्रवास करत राहण्‍याची इच्‍छा असलेल्‍या प्रवाशांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी विद्यमान नेटवर्कमध्‍ये उत्तम वेळापत्रक तयार करण्‍यात आले आहे.
बुकिंग्‍ज सुरू आहेत आणि युगांडा एअरलाइन्‍स अॅपच्‍या माध्‍यमातून सोईस्‍करपणे बुकिंगची सुविधा देण्‍यात आली आहे, ज्‍यामुळे प्रवाशी रिझर्व्‍हेशन्‍स करू शकतात, तिकिटांसाठी देय रक्‍कम भरू शकतात, प्रवासामध्‍ये बदल करू शकतात आणि बोर्डिंग पासेस् प्रिंट करू शकतात. हे अॅप गुगल प्‍ले व अॅप्‍पल आयस्‍टोअरवर उपलब्‍ध आहे.

युगांडा एअरलाइन्‍स सध्‍या दुबई, जोहान्सबर्ग, बुजुम्बुरा, नैरोबी, मोम्बासा, झांझिबार, दार एस सलाम, किलिमांजारो, जुबा, किन्शासा आणि मोगादिशू या गंतव्‍यांपर्यंत विमानसेवा देते. लागोस, नायजेरियाकरिता विमानसेवा लवरकच सुरू होणार आहे.

युगांडा एअरलाइन बाबत
युगांडा एअरलाइन्‍स २०१९ मध्‍ये सुरू झालेली युगांडाची प्रमुख राष्‍ट्रीय प्रवासी व मालवाहतूक करणारी विमानसेवा आहे. ही एअरलाइन पूर्व आफ्रिकेमध्‍ये, तसेच आसपासच्‍या आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठांमध्‍ये नियोजित विमानसेवा देते.

युगांडा एअरलाइन्‍सला २०२०, २०२१ व २०२२ मध्‍ये Ch-Aviation द्वारे वर्ल्‍ड्स यंगेस्‍ट एअरक्राफ्ट फ्लीट अवॉर्ड प्रदान करण्‍यात आला.

दृष्टिकोन : बिझनेस व लीजर ट्रॅव्‍हलरसाठी पसंतीची एअरलाइन बनणे हा होय. कंपनीबाबत अधिक माहितीसाठी भेट द्या: https://ugandairlines.com

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं