Sunday, December 28, 2025
Homeसाहित्यएवढ्याचसाठी का ?

एवढ्याचसाठी का ?

जेष्ठ साहित्यिक, कवी उद्धव भयवाळ यांची कविता आज पुढे देत आहे.
श्री उद्धव भयवाळ यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारात हार्दिक स्वागत आहे.
– संपादक

एवढ्याचसाठी का मी बसलो इथे कधीचा
तिरपा कटाक्ष टाकून गेलीस तू निघोनी

माझ्या मनातला हा भाव कुणा सांगू
ही सांजवेळ झाली, येथे नसेच कोणी

काही कसे तुला ते थोडेही वाटले ना ?
उठली तशीच तेव्हा, नाराज मज करोनी

अंधार आज इथला हा सहन होत नाही
पक्षी पसार झाले, मम खिन्नता बघोनी

येशील का पुन्हा तू सांग एकदाच मजला
वाटेस पाहुनी त्या गेलो आता थकोनी

उद्धव भयवाळ

– रचना : उद्धव भयवाळ. छत्रपती संभाजीनगर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अलका वढावकर ठाणे on माझी जडणघडण : ७८
पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”