श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातील एकमेव शासन मान्यताप्राप्त संघटना, ‘‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघ’’ सन 2022 मध्ये 25 व्या वर्षात पदार्पण केले आहे.
संघटनेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून संघटने तर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.या अंतर्गत गडचिरोली व चंद्रपूर येथील दुर्गम भागात तैनात असलेल्या पोलिस बांधवांना रक्षाबंधन निमित्त 2500 राख्या विद्यापीठाच्या ‘‘ऋणानुबंध’’ उपक्रमांतर्गत संघटनेच्या महिला सभासंदांच्या हस्ते,
श्री. प्रभाकर चव्हाण, प्रभारी संचालक, आजीवन, अध्ययन व विस्तार विभाग तथा समाजकार्य विभाग, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, चर्चगेट यांना सुपुर्द करण्यात आल्या.
यावेळी सदर विभागाचे सहाय्यक प्राध्यापक श्री.अमेय महाजन, डॉ.हेमांगी कडलग, संघटनेचे अध्यक्ष
श्री. प्रभाकर पिळणकर, महासचिव श्री. यशवंत गावडे, संघटनेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
– टीम एनएसटी. ☎️9869484800