स्टेट बँक ऑफ इंडियात संमिलित करण्यात आलेल्या “एसबीएच”च्या निवृत्त कर्मचारी संघाचे वार्षिक संमेलन नुकतेच ठाण्यात मोठ्या दिमाखात, आनंदात साजरे झाले.
या सुनियोजित संमेलनात सर्वच उपक्रम उत्तम आरोग्य विषयक असे माहितीपूर्ण होते.
दुपारच्या सत्रात झालेले मनोरंजनात्मक संगीताचे (गायन+वादनादी) कार्यक्रम खरोखरच श्रवणीय अन् कौतुकास्पद असे झाले.
यावेळी सहभागी झालेल्या सभासदांसाठी आरोग्यदायी असा सकाळचा नाष्टा उपमा +चहा, कॉफी, दुपारचे चविष्ट, रुचकर असे भोजन, दुपारचा चहा कॉफी, बिस्किटे….. म्हणजे ब्रम्हानंद होय.
या संमेलनाच्या निमित्ताने सर्व सहकारी स्नेह्यांच्या भेटीगाठी झाल्या, हा आनंद अवर्णनीय असाच !
यानिमित्ताने श्री.जयकुमारजी यांच्यासह सर्वश्री शरद जोशी, रमेश भिडे, काशीनाथ नाईक, सौ.रजनी जयकुमार, रेखा मोरवाले चाचड, दाते मॅडम, आदी ज्यांनी हा आनंद सोहळा यशस्वी करण्यासाठी हातभार लावला त्या सर्वाचे मनापासून अभिनंदन. या सर्वांना आणि त्यांच्या परिवारास निरोगी निरामय आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना.
— लेखन : नंदकुमार रोपळेकर. मुंबई.
— संपादक : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800.