भरती आषाढ घन
मनी विणेची धून
वाजता टाळ मुखात भजन
माझा पांडूरंग सा-याहून वेगळा..,.
होतो भास चराचरात
सारा जीव पापणीत
मन न्हाले चंद्रभागेत
माझ्या हरीचा उत्सवच आगळा——
डोईवर छाया तुळशीची
कश्याला चिंता उनपावसाची
देहबोली भक्ती नादाची
माझ्या माऊलीचा अंतरी उमाळा——
राव रंकाची वसने उतरूनी
भक्तीची शाल पांघरूनी
दर्शनास जमली सारी अवनी
माझ्या विठूमुळे घडतो ऐक्याचा सोहळा—-
माझा पांडूरंग आगळा वेगळा
माझा पांडूरंग आगळा वेगळा
— रचना : शुभदा डावरे चिंधडे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800