भिक्षा मागणे हा एक अध्यात्माचा प्रवास आहे. या प्रवासाला अनेक पदर आहेत जे भिक्षेशी निगडीत आहेत.
भिक्षा ही गोष्ट दिसायला सामान्य असली तरी त्यात अनेक गुण दडलेले आहेत. भिक्षा मागणारा महंत विनापत्य, विनापाश, मोह, संपत्ती, लालसा ह्या पासुन दूर असलेला निर्विकार साधक असतो. त्यामुळे तो निर्भय असतो. महंताला अनुकुल असलेले गुण भिक्षेतुन प्रगट होतात. महंताला स्वत:च्या उदरभरणा साठी, इतरांना कर्म करण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो तो वेळ भिक्षेमुळे वाचुन सत्कारणी लावता येतो. त्यामुळे भिक्षेने आपल्या कार्यासाठी त्याला भरपुर वेळ देतां येतो.
…..समर्थांच्या काळी रयतेवर यवनांचे प्रचंड अत्याचार चालु होते. रयत त्रस्त झाली होती. रयतेत एकजुट, ऐक्य नव्हते. याचा फायदा यवनांनी घेतला आणि आपले राज्य स्थिर केले. समर्थांच्या चाणाक्ष, अनुभवी नजरेने ते टिपले व ते हेरुन कठोर उपाययोजना करण्याचे त्यांनी ठरवले.
समाजातील नानाविध जाती, जमाती, पंथ इत्यादींना रामभक्ती व राष्ट्रभक्ती द्वारे, साऱ्या समाजाला राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे ठरवुन त्यांनी कार्याला सुरवात केली.
‘जनतेने जनतेमधुन जनतेचे सरकार’ ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणण्यासाठी सारा समाज राष्ट्र प्रेमाने एकत्र आणुन तो बल संपन्न करणे महत्त्वाचे होते. त्यांचा कर्मयोग व भक्तियोग याचा सुरेख संगम असणारा प्रभावी मंत्र होता…… “केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान हवे“. यासाठी समर्थांनी जागोजागी मठांची स्थापना करुन संप्रदायाच्या कामासाठी तेथे नि:स्पृह महंतांची योजना केली.
समर्थांनी उभा केलेला हा प्रचंड व्याप, हिंदुस्तानभर पसरलेले मठ – महंतांचे जाळे सांभाळण्यासाठी द्रव्याची, धनाची सोय करण्यासाठी, ह्या प्रचंड कार्याच्या व्यापासाठी त्यांनी भिक्षेवर भर दिला, भिक्षेच्या संकल्पनेची मदत घेतली. भिक्षेवर सर्वव्याप
सांभाळण्याने समर्थ कोणाचेही मिंधे झाले नाहीत किंवा धनिकांचे लाचार झाले नाहीत. संघटन कौशल्याच्या जोरावर आणि महंतांना, शिष्यांना स्वायत्त भिक्षेची महती, महत्व त्यांनी पटवून दिले.
भिक्षा हे काही नुसते पोट भरण्याचेसाधन नसुन ते सांप्रदायिकांसाठी व्रताचरण होते. भिक्षा मागणे ही कोणालाही (महंत) लाज वाटत नसे. संप्रदायाची दिक्षा देताना समर्थ, महंतांना, शिष्यांना डोक्यावर बांधण्यासाठी शिरोवस्त्र, कंबरेला गुंडाळण्यासाठी एक वस्त्र म्हणजे मेखला, कंबरेला बांधण्यासाठी समनामांकित चिन्ह, एक भगवे निशाण आणि खांद्यावर बाळगायची झोळी, जिच्यामुळे गुरु आज्ञा म्हणुन महंताला भिक्षा मागता येत असे.
महंतांनी भिक्षेच्या माध्यमातुन वेगवेगळे प्रदेश
हिंडून लोकांच्या ओळखी वाढवून त्यांना संप्रदायाच्या कार्यांची माहिती द्यावी. असे जे महंत समाज्योध्दारासाठी आपला वेळ देतात त्यांना भिक्षा मागण्याचा शास्त्राने अधिकार दिला आहे.
”नित्य नुतन हिंडावे। उदंड देशाटन करावे। तरीच भिक्षा मागता बरवे। श्र्लाघ्यवाणे। अखंड भिक्षेचा अभ्यास । तयास वाटेना परदेस । भुवतत्रै।।
समर्थ महंतांना सांगत की, भिक्षेचा अभ्यास करा. सांप्रदायिक कार्यासाठी जनसमुदाय मिळवणे, आजुबाजुचा परिसर, देशस्थिती न्याहाळणे ह्यासाठी भिक्षा हे एक उत्तम साधन आहे. कार्य प्रसारासाठीचा उत्तम मार्ग आहे.
……” ऊॅंभवति भिक्षांदेही । “ या ब्रीदाचे रक्षण केले पाहिजे. ज्या साधकाला ध्यान – धारणेचा अभ्यास करताना आपल्या प्रपंचाकडे अथवा आपल्या देहाकडे लक्ष द्यायला वेळ नसतो, सर्वसंग परित्याग करुन आत्म सात्क्षाकारासाठी संन्यासी वृत्तीचा अवलंब करणाऱ्या साधकाला देहापुरते अन्न मागण्याचा अधिकार शास्त्राने दिला आहे. अखंड अभ्यास करुन समाज जीवनाची तत्वे शोधणाऱ्या अभ्यासकांना दैनंदिन जीवनासाठी जरुरी पुरते अन्न, वस्त्र पुरविणे ही समाजाची नैतिक जबाबदारी आहे असे समर्थ सांगतात.
समाज हितासाठी, धर्म व संस्कृती रक्षणासाठी झटणाऱ्या, लोकसंग्रह करणाऱ्या पुरुषाने भिक्षा मागण्यास कमीपणा नाही हेही समर्थ सांगतात. भिक्षेने देह बुद्धी क्षीण होते व वैराग्याचा उदय होतो त्यामुळे भिक्षेला अध्यात्मात महत्त्वाचे स्थान आहे.
……धर्मप्रसारातुन राष्ट्र प्रसार करण्याच्या हेतुने ठिकठिकाणी किर्तने करत असतानाच रामदास स्वामींनी भिक्षा मागण्याचे तंत्र अवलंबले. समाज्योध्दरासाठी गुणी, निष्ठावंत, बलसंपन्न, संस्कारी व झपाटलेले तरुण हेरण्यासाठी स्वामींचे प्रभावी भिक
भिक्षेनेवोळखी होती । भिक्षेने भ्रम चुकती । अखंड भिक्षेचा अभ्यास । तयास वाटेना परदेश । जिकडेतिकडेस्वदेश । भुवनत्रैं।।
……समर्थांनी भिक्षा मागताना महंत/ शिष्यांसाठी कठोर नियम घातले.
“काही भिक्षा आहे म्हणावे। अल्प संतोषी असावे। बहुत आणिता घ्यावे। मुष्टी एक ।। …… १) एकाच ठिकाणी राहु नये, अधिक वास्तव्य करु नये, सतत त्याच त्याच घरी भिक्षेसाठी जाऊ नये
२) भिक्षा मागताना “जय जय रघुवीर समर्थ/ओम भवती भिक्षांदेह“ म्हणताना सोबत एक मनाचा श्लोक म्हणावा.
३) दुःखी घरी भिक्षा मागु नये
४) भिक्षेला नकार मिळाल्यास त्वरित दुसऱ्या घरी जावे परंतु निराश होऊ नये.
५) फक्त पाचच घरी भिक्षा मागावी.
६) अत्यंत आनंदी व संतोषी वृत्तीने केवळ मूठभर भिक्षा स्विकारताना तेथे यजमानाकडे ज्ञानबोध अवश्य करावा.
७) भिक्षा मागताना महंताने कोणतीही लाज बाळगु नये, त्याच्या कडे जे कार्य सोपवले आहे ते निष्ठेने, पुर्ण तळमळीने जीव ओतुन करावे कारण समर्थांच्या मते भिक्षा आणि भीक ह्या दोन्ही मधे जमिन – अस्मानाचा फरक आहे. भिकेत लाचारी असते तर भिक्षेत
समाज्योद्धरासाठी सांप्रदायिक कार्याचा प्रसार आणि जनजागृती हा मुख्य हेतु असतो.
८) भिक्षा मागताना ते स्थळ, तिथली
परिस्थिती, यजमान व घरची मंडळी, स्त्रियांचे घरातील स्थान, घरातील मुलांवर झालेले संस्कार ह्या सर्वांचे योग्य निरीक्षण करावे व त्यातूनच राष्ट्र कार्यासाठी कार्यकर्ते निवडावेत
९) नेहमी संन्यस्त वृत्तीने राहुन नित्य रात्री मंदिरे व अन्य ठिकाणी संकीर्तने करुन समाजात राष्ट्र भक्तीचे बीज रोवावे
१०) मिळालेल्या भिक्षेचे ५ भाग करुन जलचर , भूचर इत्यादींना देऊन मगच पाचवा भाग स्वत: ग्रहण करावा
११) भिक्षेत शिजलेले अन्न मिळाल्यास ते पाण्यात बुडवून घ्यावेनी मगच ग्रहण करावे. ज्यामुळे अन्नातील दुषित संस्कार निघुन जातील.
……रामदास स्वामींची भिक्षेची संकल्पना अचुक ठरली. त्यातुन त्यांना बरेच शिष्य मिळाले. उदा. कल्याण स्वामी, अंबिका, वेण्णा स्वामी, अक्का स्वामी इ.
…….. भिक्षेच्या काही पाळायच्या नियमांबरोबर महंतांना, शिष्यांना, विद्यार्थ्यांना त्याचे काही फायदेही होत असत. पुर्वीच्या काळी गुरुगृही मुले शिक्षणासाठी जाऊन रहात असत. विद्यार्जन आणि गुरुसेवा ह्याला पुर्णवेळ मिळावा म्हणुन ते ५ घरी भिक्षा किंवा माधुकरी मागत असत. प्रत्येकाने माधुकरी मागायची असल्याने समानता हा ईश्वराचा गुण अंगी बाणत असे. भिक्षेमुळे
खाण्याच्या पदार्थांविषयी असलेली आवड – निवड, आसक्ती मनातून न्युन होत असे.
माधुकरीतुन मिळालेले अन्न ठराविक प्रमाणात असल्यामुळे साधकाला मिळालेले असेल त्या प्रमाणात खाण्याची सवय लागत असे. काही ठिकाणी त्यांचा अपमान होत असे, काही वेळा उपवासही घडत असे. अशा वेळी त्यांचे षड्ररिपुंचे नियंत्रण होऊन आत्मिक बळ, स्व-उन्नत्ती होत असे.
…….माधुकरी आणि भिक्षेत थोडासा फरक आहे. जसे
विद्येला त्या महत्व होते, असे जुना काळ तो ।
विद्येपायी, देशा जाई
कुणी विप्र बाळ तो ।।
घर सोडुन बाहेर गावी गेलेल्या मुलांच्या शिक्षणात खंड पडु नये म्हणुन जेव्हा गरीब, होतकरु विद्यार्थी विशिष्ट घरी भिक्षा मागुन कोरडे किंवा शिजवलेले अन्न उदरभरणासाठी घेत असत व त्यांवर गुजराण करुन रहात असत. ह्याला माधुकरी हा पण शब्द
आहे. पण इथे ते घर बदलत नसत व शिजवलेले अन्न पण ग्रहण करत असत. हा पण एक भिक्षेचा छोटासा प्रकार आहे .
…….ज्यावेळी समर्थांचे महंत भिक्षेसाठी दारोदारी येत असत त्यावेळी घरातील यजमान त्यांची वाट पहात असत. आपल्या ह्यातुन समाजासाठी काही तरी सेवा घडते आहे हा त्यातुन भाव व्यतीत होत असे. समर्थांची भिक्षा ही संकल्पना त्यावेळी उच्च अध्यात्मिक पातळीवर पोचली होती. त्यावेळच्या भिक्षेच्या संकल्पनेचे मुळ आजही आपल्याला समाजात दिसते.
……….समाजातुन भिक्षेच्या सहाय्याने मिळालेल्या शिष्यांमुळे स्वामी समाज्योद्धार करु शकले. भिक्षेमुळे समर्थ स्वराज्य आणि सुराज्य समर्थपणे राबवु शकले.
साडेतीनशे वर्षांपूर्वी जेव्हा शिवतर घळीत इ. स. १५७६ ते इ. स. १५९८ मधे जेव्हा ग्रंथराज दासबोधाचे लिखाण चालु होते. तेव्हा समर्थांनी भिक्षेच्या संकल्पनेचा प्रसार केला आणि तेव्हा पासुन त्यांनी सर्व शिष्यांच्या साथीने सगळीकडे भिक्षा ही
संकल्पना आचरणात आणली. १२ वर्षांच्या कालावधीत कल्याण स्वामी, आक्काबाई, दिवाकर गोस्वामी, अनंत कवी ह्या शिष्यांच्या उदरभरणाची भिक्षेमुळे सोय होत असे .
“” ओम भवति भिक्षां देही । “”

– लेखन : श्रध्दा श्री. गोखले
– संपादन : अलका भुजबळ. 9869484800
खूप छान, माहितीपूर्ण लेख, समर्थांचे कार्य ह्या लेखामुळे माहिती होईल.
खूप सुंदर विवेचन.