आपल्या ऑफ्रोह संघटनेच्या कार्यकर्त्यांनी
घटस्थापनेपासून सुरु केलेल्या आमरण उपोषण आंदोलनास नवीन सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे उपोषण मंडपाला भेट देऊन आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत आश्वासन देऊन उपोषण सोडवले.
हे आपल्या संघटनेचे मोठेच यश आहे.
ऑफ्रोह संघटनेच्या छताखाली आपण 33 अन्यायग्रस्त अनुसूचित जमातीचे सर्व बंधू भगिनी एकवटलो आहोत आणि सर्वश्री शिवानंदभाऊ सहारकर, राजेश सोनपरोते, गजेंद्र पौनिकर आणि त्यांचे धडाडीचे कार्यकर्ते यांनी अथक प्रयत्नांनी व मेहनतीने ऑफ्रोहच्या माध्यमातून आपल्या सुखदुःखासाठी हक्काचे व्यासपीठ उभे केले आहे.
तसे पाहता, गेली 40 – 50 वर्षे आपण न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करत आहोत. पण न्याय मिळत नव्हता. दिशा मिळत नव्हती. आपल्यापुढे योग्य नेतृत्व नव्हते. आपण दिशाहीन होऊन अन्यायाच्या गर्तेत भरकटत होतो. त्यामध्ये आपल्यापैकी कितीतरी बांधवांच्या नोकर्या गेल्या. कुटुंबच्या कुटूंबे रस्त्यावर आली. अश्रू पुसायला कोणी नाही. अशा अंध:कारमय दिवसात 2020 मध्ये शेगावमध्ये गजानन महाराजांच्या कृपाशिर्वादाने श्री शिवानंद सहारकर, सोनपरोते, गजेंद्र पौनिकर, रुपेश पाल, मनीष पंचगाम, ओमप्रकाश कोटरवार, दत्तात्रय अन्नमवाड, मनोज जुनोनकर, डॉ दिपक केदारे आणि त्यांच्या धडाडीच्या कार्यकर्त्यांनी ऑफ्रोह संघटनेची मुहूर्तमेढ रोवून आपल्या 33 अन्यायग्रस्त अनुसूचित जमातीच्या बांधवांमध्ये न्याय्य हक्कांसाठी लढण्यासाठी संघर्षज्योत चेतवली.
पाहता पाहता आपल्या ऑफ्रोह संघटनेला फेब्रुवारी 2022 मध्ये दोन वर्षे पूर्ण झाली. एवढ्या अल्पकालावधीत आपली ऑफ्रोह संघटना वटवृक्षाप्रमाणे वाढली आहे आणि आज आपल्यासाठी आधारवड झाली आहे. ती आपल्या जीवन मरणाच्या प्रश्नाशी जोडली गेली आहे. आपल्या सुखदुःखाशी जोडली गेली आहे. आपल्या 33 अन्यायग्रस्त अनुसूचित जमातीच्या बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी लढण्यासाठी अहोरात्र जागृत राहून ती नि:स्वार्थीपणे, कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता कार्यरत आहे. एकसंघ परिवार ताकदीने वादळात उभा रहावा आणि एकजूटीने स्वसामर्थ्याने आलेल्या संकटांशी झुंजावा तसा आपला ऑफ्रोह संघटनेचा परिवार आहे.
आपल्या परिवारात संशोधक आहेत जे आपल्या आदिम इतिहासाचे संशोधन करुन समाजापुढे, सरकारपुढे, न्यायालयापुढे मांडत आहेत. आपल्या परिवारात कायदेतज्ज्ञ आहेत, जे आपल्या अन्यायग्रस्त बांधवांच्या न्यायालयीन लढाईत त्यांच्या पाठीशी उभे रहात आहेत. आपल्या परिवारात पदरमोड करुन विविध उच्च पदस्थ व्यक्तींना भेटत असतात. यात मा. राज्यपाल, मा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालक मंत्री, राज्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी इतर मान्यवर यांच्याही समावेश आहे. या सर्वांशी सातत्याने संपर्क साधून आपल्या मागण्यांचे निवेदन मांडणारे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. आमरण उपोषणसारख्या आंदोलनात बसणारे बांधव आहेत.

हे सर्व पाहिले की आपण एका मोठ्या कुटुंबात वावरतो आहे असे प्रकर्षांने जाणवत रहाते आणि आपल्या या कुटुंबासाठी आपणही काहीतरी केलेच पाहिजे अशी भावना वाढीस लागते. याच भावनेतून मी स्वतः मा.मुख्यमंत्री, मा.राज्यपाल महोदयांची भेट घेऊन आपल्या ऑफ्रोह संघटनेचे निवेदन त्यांना दिले.

आपल्या या कुटुंबात स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला आहे. जिल्ह्याजिल्ह्यात महिला आघाडी दमदारपणे आपली कामगिरी बजावत आहे. कुटुंबात सर्वांचा एकोपा ही कुटुंबाची ताकद राहते तसे आपल्या ऑफ्रोह संघटनेतील एकोपा, एकमत, एकजूट हीच आपली ताकद आहे.
ऑफ्रोह संघटनेच्या माध्यमातून आपण आजवर अनेक दमदार पाऊले टाकली. विरोधकांच्या कारवायांना पायबंद घातला आणि त्यांचा बिमोड केला. अनेक ठिकाणी अधिसंख्य बांधवांच्या संबंधित आस्थापनांशी संपर्क साधून त्यांच्यावरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला. अनेक न्यायालयीन प्रकरणी त्यांना मदतीचा हात दिला. संघटनेने आपले ध्येय निश्चित केलेले आहे आणि त्या ध्येयाकडे यशस्वीपणे वाटचाल करण्यामध्ये असंख्य बांधवांचे अथक परिश्रम, मेहनत, प्रयत्न आहेत.
आज आपली ऑफ्रोह संघटना एक जिव्हाळ्याची कुटुंबसंस्था झाली आहे. भविष्यात या संघटनेच्या माध्यमातून आपल्या पुढील युवा पिढीला त्यांच्या करीयर उभारणीसाठी व्यक्तिमत्त्व विकास घडविण्यासाठी प्रयत्न करता येतील. आपल्यातील युवकांना आत्मनिर्भर होण्याचे धडे देता येतील. आपल्या युवा पिढीतील सुप्तगुण हेरुन त्यांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करता येतील.
आज आपण अन्यायग्रस्त म्हणून जगत आहोत. आपल्याला सन्मानाने जगण्यासाठी, सामाजिक दर्जा मिळण्यासाठी, न्याय्य हक्कांसाठी ऑफ्रोह संघटना कटिबद्ध आहे. आपले एक कुटुंब आहे आणि आपली या कुटुंबाशी बांधिलकी आहे. जय आफ्रोह !

– लेखन : सौ प्रिया रामटेककर. उपाध्यक्ष
ऑफ्रोह राज्य महिला आघाडी.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +919869484800
ऑफ्रोह संघटना ही अन्याया विरुद्ध नि :स्वार्थपणे लढणारी संघटना आहे.भविष्यात अनुसूचित जमातीच्या बांधवाना,कुटूंबाला नक्कीच फायदा होईल.मार्मिक आणि मार्गदर्शन करणारा हा लेख आहे 😋
ऑफ्रोह संघटना ही अन्याया विरुद्ध
नि :स्वार्थपणे लढणारी संघटना आहे.भविष्यात अनुसूचित जातीच्या बांधवाना किंवा कुटुंबाना
निश्चित फायदा होईल.
तुझ्या सारखी रणरागिणी बहिण लाभली हे व्यक्तीश:व आफ्रोह संघटनेचा राज्य महासचिव या नात्याने मी तुला व तुझ्या कार्याला मानाचा मुजरा करून या दिपावलीच्या काळात लक्ष्मी लाभली हेच धन्य मानतो.
जय आफ्रोह,जय आफ्रोह रणरागिणी महिला आघाडी.
ऑफ्रोह संघटना नसून एक कुटुंब आहे.
ऑफ्रोह मुळे अधिसंख्य कर्मचाऱ्यांना नक्की न्याय मिळेल, देर है लेकीन अंधेर नहीं|
जय ऑफ्रोह.
ऑर्फोह संघटन शक्ती चा हा फार मोठा विजय आहे. एवढ्या अल्प कालावधीत ऐवढे मोठे यश संपादन करने व संघटना ऐक संघ ठेवने हे सर्व अत्यंत कठीण कार्य आहे. या काळात आपल्या संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जे परिश्रम घेतले ते खरोखरच कौतुकास्पद आहे. यात मुख्यतः सहायक सर, प्रिया ताई, कोळी साहेब, नंदनवार साहेब, निमगावकर, स्मिता ताई व समस्त ऑफोह चे पदाधिकारी व कार्यकते यांच्या अनमोल सहभाग व परिश्रम आहे. सवाॅना दिवाळी च्या सुभेच्छा व धन्यवाद..
OFROH संधटणा आपल्या समाजासाठी खुप चांगले काम करत आहे.संधटणेतील सर्व पदाधिकारी व सदस्य व जे संघटनेशी जुळले आहेत त्यांचे अथक प्रयत्नाने पुढे चांगले दिवस येतील यात तिळमात्र शंका नाही.OFROH संधटणेला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
ऑफ्रोह संघटना नसून एक कुटुंब आहे. संघटनेची बांधणी सर्व जिल्ह्यात केली आहे. त्यामुळे अल्पावधीतच शासनाला ऑफ्रोहच्या मागणीची दखल घ्यावी लागली. ऑफ्रोह आपल्या अधिसंख्य कर्मचारी बांधवास न्याय मिळवून देईल ही खात्री आहे.
संघटनेच्याभविष्यातील वाटचालीस शुभेच्छा
शिवानंद सहारकर
राज्याध्यक्ष
फ्रोह
व्वा अतिशय प्रेरक प्रवास आहे आफ्रोह संघटनेचा. एवढ्या अल्पकाळात संघटनेने राबविलेली आंदोलने, संघटना बांधणी व विस्तार पाहता संघटना व संघटनेचे खंदे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या कार्याला सलाम. अतिशय वेधक लेख. हार्दिक अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा