नो कट नो पेस्ट हे वैशिष्ट्य आहे एका कलेचं ; अर्थात ओरिगामीचं !! कागदांना घड्या घालून बनवलेल्या वैविध्यपूर्ण वस्तूंचे प्रदर्शन व कार्यशाळा ठाणे ओरिगामी ट्रस्ट तर्फे ठाण्याच्या राम मारूति रस्त्यावरील मधु हळदणकर सभागृहात दि. ९,१०,११ डिसेंबर रोजी भरवण्यात आले होते.
या प्रदर्शनात सहा कलाकारांनी आपली कला लोकांसमोर प्रतिकृतींच्या रूपाने मांडली होती.
थ्री डी ओरिगामीच्या असंख्य वस्तू श्री.विश्वजीत कानिटकर, टेसलेशन्स श्री. रामानंद बेडेकर तसेच विवेक म्हात्रे, जयंत कयाळ, राजेश तांबे, छोटा अद्वैत इत्यादी कलाकारांच्याही वैविध्यपूर्ण वस्तू प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या.
ओरिगामी कलेचा प्रचार प्रसार व्हावा, लहान मुलांमध्ये याची आवड निर्माण व्हावी या हेतूने ठाणे ओरिगामी ट्रस्ट गेली १४ वर्षे सातत्याने प्रयत्न करीत आहे.
या प्रदर्शनाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तसेच कलाकारांचेही कौतुक केले.
या प्रदर्शनाला ठाण्यातील कागदी फुलांच्या जनक मेहेंदळे आजी, सुप्रसिद्ध जादूगार स्नेहराज इंद्रजित तसेच मुंबई ओरिगामी मित्र मंडळाच्याही सदस्यांनी भेट दिली.

– लेखन : चैताली कानिटकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
