Monday, July 14, 2025
Homeबातम्या"ओला"त बसताय ? सावधान !

“ओला”त बसताय ? सावधान !

काही वर्षांपासून पारंपरिक काळ्यापिवळ्या टॅक्सी बरोबरच “ओला” टॅक्सी खूप धाऊ लागल्या आहेत. फोन केला की हवी तिथे “ओला” हजर, भाड्यात ही स्टँडर्ड दर आकारणी अशा अनेक बाबींमुळे “ओला”ची सेवा चांगलीच लोकप्रिय ठरली आहे.
असे असले तरी, मुंबई येथील पत्रकार देवश्री भुजबळ यांना “ओला”चा नुकताच आलेला अनुभव सर्वांनाच सावधगिरीची सूचना देणारा ठरला.

त्याचे असे झाले की, देवश्री भुजबळ या पुण्याजवळील उरुळी कांचन येथील काम आटोपून शुक्रवारी ‘ओला’ ने मुंबई येथे येण्यास निघाल्या. तीन तासाच्या प्रवासानंतर गाडी लोणावळा पार करून घाटात पोहोचली आणि देवश्री यांना गाडीत प्राण्याचा असतो, तसा काहीसा आवाज ऐकू यायला लागला. गाडीत कुत्रे किंवा मांजर आहे का ? अशी विचारणा त्यांनी ड्रायव्हर प्रसाद महामुनी याच्याकडे केली असता, सहज बोलावे तसा तो म्हणाला, गाडीत “टॉमी” आहे !

प्रथमत: देवश्री भुजबळ यांना काही कळलेच नाही. खोदून खोदून विचारल्यावर त्याने सांगितले की, गाडीत टॉमी नावाचा कुत्रा आहे. हे ऐकताच त्यांना धक्काच बसला.
हा धक्का ओसरायच्या आधीच त्यांना दुसरा धक्का बसला. कारण तो पर्यंत दुसऱ्या कुत्र्याने आपले तोंड बाहेर काढले होते. तेव्हा कुठे त्यांच्या लक्षात आले की, गाडी चालवताना ड्रायव्हर सारखा एकीकडे रस्त्याकडे तर दुसरीकडे पायांकडे का सारखा बघत होता ते !
त्यांनी ही कुत्री सोबत का आणली ? असे विचारल्यावर ड्रायव्हर म्हणाला, त्यांना घरी बघण्यासाठी कुणी नाही, म्हणून सोबत आणले.

कसाबसा एकदाचा प्रवास आटोपून घरी पोहोचताच देवश्री भुजबळ यांनी ‘ओला’ कंपनी कडे ऑनलाईन तक्रार नोंदविली. या तक्रारीची लगेच दखल न घेता जवळपास २४ तासांनी ओला कंपनीचे सुरक्षा अधिकारी झिशान अख्तर यांनी फोन करून सांगितले की, त्या ड्रायव्हर सोबत प्रवास केलेल्या अन्य प्रवाश्यांशी बोलून आम्ही अधिक माहिती घेऊ !

ड्रायव्हरच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे जीवघेणा अपघात घडला नाही, हे आपले नशीब असे म्हणून
देवश्री भुजबळ “त्या” ड्रायव्हर वर काय कारवाई होतेय ? याची वाट पहात आहेत.
मात्र या प्रकारावरून सर्व सामान्य प्रवाशांनी यापुढे “ओला”त बसण्यापूर्वी गाडीत कुत्रे, मांजर किंवा अन्य तत्सम काही नाही ना ? याची खात्री करून घेतलेली बरी जेणेकरून पुढील अनवस्था प्रसंग टळू शकेल.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

6 COMMENTS

  1. देवेश्रीला आलेला भयावह अनुभव, सर्वांना सावधानतेचा इशारा मिळाला आहे. वाहक चालकाने असे करणे नक्कीच चुकीचे आहे.
    काम आणि माया हया दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत.
    सर्वांनी ओला त बसण्याआधी जरूर काळजी घ्यावी.
    आता तर पावसाचे दिवस येत आहेत, तेव्हा सरपटणारे प्राणी गाडीत आसरा घेतात.तरी गाडीत नजर टाकून, मग बसा.

    सौ.वर्षा महेंद्र भाबल.

  2. धक्कादायक! चालकावर कारवाई व्हायला हवीच.

  3. ओला तील प्रवास कुत्र्यांसोबत?? हे खूपच धक्कादायक आहे.
    ओला ही प्रवासी आणि खाजगी रित्या भाडेतत्वावर घेतलेली टॅक्सी आहे.त्यामुळे त्या टॅक्सीत कुत्रेअसणं हे नक्कीच आक्षेपार्ह आहे.आणि त्याची दखल संबधित अधिकार्‍यांनी घ्यायलाच हवी.
    पण ही पोस्ट वाचताना मी थोडी भावविवशही झाले.
    वाहन चालकाची दोन वाक्ये.एक…तो कुत्रा नाही .टॉमी आहे.
    आणि दुसरे ,घरी यांना कुणी बघणारं नाही.
    प्राणीप्रेमाचे एक उदाहरण मानायचे का याला?. एखादी स्त्री जेव्हां नोकरी साठी बाहेर पडते तेव्हा तिचेही चित्त तिच्या पिलांपाशी असेच असते ना…पण नोकरीच्या ठिकाणी ती आपल्या मुलांना नाही घेउन जाऊ शकत. तिला पर्यायी व्यवस्था करावी लागते.
    म्हणून देवश्रीची तक्रार योग्यच आहे.

  4. 🌹जीवनाच्या धावपळीत आपण बरंच काही विसरून जातो, पण स्वतः ची काळजी घेणं पण खूप जरुरी आहे.
    Ola, uber पण पूर्ण भरोसा करणं आता सोडावं लागेल

    ताईंचा अनुभव यातून शिकावं लागेल

    अशोक साबळे
    एक्स. Indian Navy
    Ambernath

  5. बाबरे थक्क करणारी बातमी . खरंच खबरदारी घ्यायला हवी .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments