पती पत्नीच्या नात्याचा
ओलावा मनात रुंजी घालतो
मनात विण घट्ट करून
ओंजळी भरुनी सुख देतो
ओलावा ऋणानुबंधाचा
निस्वार्थ प्रेमबंध जुळवितो
एकमेकांना साथ देऊन
प्रेमभावना मनात टिकवितो
ओलावा मैत्रीच्या बंधनांचा
मित्रत्वाची जाणिव करुन देतो
वेळप्रसंगी मदतीसाठी धावून
एकमेकांना समजून साथ देतो
ओलावा सासु सूनेच्या नात्यांचा
मायलेकीच्या नात्यात बहरतो
नाजूक धागा आपुलकीचा
अलवार मनामध्ये रुजतो

– रचना : परवीन कौसर, बेंगलोर